किनारपट्टीला उधाणाचा तडाखा; सागराच्या आक्रमणाची दहशत कायम, संसार गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:37 AM2019-07-05T00:37:19+5:302019-07-05T00:39:57+5:30
२९ जून पासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्याला पुरते झोडपून काढले असून सर्वसामान्यांचे जीवन पुरते अस्तव्यस्त करून टाकले आहे.
पालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीवर ५.८३ मिटर्सच्या लाटा निर्माण होणार असल्याच्या हवामान खात्याच्या इशार्यानंतर किनाऱ्यावरील घरांना निर्माण झालेला धोका वारा आणि पावसाने काहीकाळ उघडीप दिल्याने तूर्तास टळला असे वाटत असतांना गुरूवारी अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने लाटांनी बंधारा पार करून किना-यावरील घरांना धडक दिली.
२९ जून पासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्याला पुरते झोडपून काढले असून सर्वसामान्यांचे जीवन पुरते अस्तव्यस्त करून टाकले आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्यांना 2 जुलै रोजी समुद्रात 5.54 मिटर्सच्या उंच लाटा उसळणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सातपाटी येथे मागच्या वर्षी गावात समुद्राचे पाणी घुसून सुमारे 300 घरांचे झालेले नुकसान पाहता खासदार राजेंद्र गवितांच्या प्रयत्नाने सातपाटीच्या पश्चिमेस नव्याने 500 मीटर्स बंधाºयाच्या कामाला सुरु वात करण्यात आली होती. जुन्या बंधाºयाला ज्या ठिकाणी भगदाडे पाडून गावात पाणी शिरले होते ती भगदाडे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र अन्य वाढीव अशा 1 हजार मीटर्स बंधाºयांची मागणी शासन पातळीवर विचाराधीन असल्याने दक्षिणेकडील बंधाºयाचा मोठा भाग आजही धोकादायक अवस्थेत पडून आहे.त्यामुळे गावातील अनेक कुटुंबे चिंताग्रस्त बनली होती.
जुलै महिन्याच्या सुरुवाती पासूनच 5.83 (सुमारे 20 फूट) मीटर्स उंचीच्या लाटा उसळणार असल्याने सातपाटीसह किनारपट्टीवर राहणाºया नागरिकांनी पॉलिथिनच्या मोठ मोठ्या गोण्यात माती भरून त्या व मिळेल त्या वस्तू आपल्या घराच्या भिंतींना टेकून समुद्राच्या लाटा थोपवून धरण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
मंगळवारी ५.५४ मीटर्स च्या लाटा उसळणार असल्याने आणि दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व धास्तावले होते. दुपारी दीड वाजल्या पासून या लाटा उसळणार असल्याने सर्वांच्या नजरा समुद्राकडे लागल्या होत्या. परंतु सुदैवाने भरतीला सुरु वात झाल्यानंतर वारा-पावसाने उघडीप दिल्याने निर्माण झालेल्या लाटा प्रभावहीन ठरल्याने किनारपट्टीवरील लोकांनी सध्यातरी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु गुरु वारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक समुद्राने रौद्र रूप धारण करून लाटांनी संरक्षक बंधारा पार करून किनाºयावरील घरांना धडका द्यायला सुरु वात केली.
५ आॅगस्ट पर्यंत पाच मीटर्सच्या लाटा उसळणार असल्याने वसई ते बोर्डी दरम्यानच्या किनारपट्टीवरील घरांना असणारा धोका कायम राहणार आहे.
बंधाºयांना मंजुरी द्या!
तत्पूर्वी सातपाटी गावातल्या बंधाºयाला अनेक ठिकाणी भागदाडे पडल्याने पतन विभागाने तत्काळ दखल घेत ह्या बंधाºयाला पडलेली भगदाडे युद्धपातळीवर बुजवून १ हजार मीटर्स च्या बंधाºयासह जिल्ह्यातील सर्व मंजूर बंधाºयांच्या प्रस्तावाना आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्व भूमीवर तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी मच्छीमाराकडून होत आहे.