सिडको आयुक्यांच्या हस्ते बुद्धीमत्ता अन् शौर्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:40 PM2018-06-25T23:40:24+5:302018-06-25T23:40:26+5:30

प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना अनेक अडथळे पार करणाऱ्या तालुक्यातील होत करु मुलांनी स्कॉलरशिपच्या पुढे जात

Cognizance of wisdom and courage in the hands of CIDCO IKU | सिडको आयुक्यांच्या हस्ते बुद्धीमत्ता अन् शौर्याचा गौरव

सिडको आयुक्यांच्या हस्ते बुद्धीमत्ता अन् शौर्याचा गौरव

googlenewsNext

जव्हार : प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना अनेक अडथळे पार करणाऱ्या तालुक्यातील होत करु मुलांनी स्कॉलरशिपच्या पुढे जात विविध स्पर्धा परीक्षेमध्ये झेंडा रोवला आहे. हा विषय सनदी नोकरी व शिक्षणा पुरता मर्यादीत न राहतात देशासाठी रक्त सांडणाºया लष्करी सेवे पर्यंत आहे. या बुद्धीमत्ता, अथक परिश्रम आणि पराक्रमाचा गौरव करण्यासाठी रविवारी (दि.१७) सिडकोचे आयुक्त अशोक शिंगारे उपस्थित होते.
जव्हार ठाणे मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शेजारील भागशाळेमध्ये पारपडलेल्या या कार्यक्रमासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रातुना येथील रामदास भोगाडे या बीएसएफ जवानाला नक्षलवाद्याचा शोध घेताना भूसुरुंगावर पाय पडल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन्ही पाय गमवावे लागले होते. आपला पाय भूसुरुंगावर पडल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून त्यांना आपल्या सोबतच्या तीस जवानांना दूर जाण्याची सूचना करुन अनेकांचे प्राण वाचवले होते. तसेच, वळवंडा खडकीपाडा येथील कल्पेश जाधव याने वसतीगृहामध्ये शिक्षण घेऊन एमपीएससीची परीक्षा पास होऊन कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक पदावर कार्य करीत आहेत.

Web Title: Cognizance of wisdom and courage in the hands of CIDCO IKU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.