नालेसफाईच्या पाहणी दरम्यान झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आयुक्तांचे आदेश 

By धीरज परब | Published: May 11, 2023 09:02 PM2023-05-11T21:02:29+5:302023-05-11T21:02:41+5:30

महापालिकेनं ठेकेदाराला मार्फत नालेसफाईच्या कामाला सुरवात केली आहे .

Commissioner's order to remove encroachments during drainage inspection | नालेसफाईच्या पाहणी दरम्यान झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आयुक्तांचे आदेश 

नालेसफाईच्या पाहणी दरम्यान झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आयुक्तांचे आदेश 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - पावसाळ्या आधी मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलेल्या नाले सफाईच्या कामाचा आढावा घेताना पाहणी दरम्यान नाल्या व खाडी क्षेत्रात आढळून आलेली अतिक्रमणे व बेकायदा भराव काढूनालेसफाईच्या पाहणी दरम्यान झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आयुक्तांचे आदेश न टाकण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत . त्यामुळे गेल्या अनेक वर्षां पासून खाडी आणि नाले क्षेत्रात झालेल्या अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे . 

महापालिकेनं ठेकेदाराला मार्फत नालेसफाईच्या कामाला सुरवात केली आहे . परंतु केवळ ठेकेदार आणि खालच्या कर्मचारी - अधिकारी यांच्यावर विसंबून न राहता आयुक्त ढोले यांनी नालेसफाईची पाहणी सुरु केली आहे . महाजनवाडी नाला,  मीरा गावठण नाला, महाविष्णू मंदिर तलाव व नाला, पेणकरपाडा येथील खोडियार नगर नाला, सुंदर नगर व रेल्वे समांतर येथील नाला , घोडबंदर अदानी पॉवर हाऊस येथील नाला, १५ क्रमांक बस स्टॉप जवळील नाला, सृष्टी रोड व मिरा रोड स्मशान भूमी मागील जाफरी खाडी आदी प्रमुख भागांची पाहणी आयुक्तांनी केली . 

या पाहणी दरम्यान नाले व खाडी परिसरात अतिक्रमण व भराव झालेले आढळून आल्याने ते हटवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले . वास्तविक शहरातील प्रमुख खाड्या आणि नाले ह्यातून पावसाळी पाण्याचा निचरा होत असताना त्यात होणाऱ्या भरीव - अतिक्रमणा कडे अतिक्रमण व सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी - अधिकारी ,  प्रभाग अधिकारी , स्वच्छता निरीक्षक आदीं कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष गेल्या अनेक वर्षां पासून केले जात आहे . त्यामुळे खाडी व नाले अरुंद होत चालले असून पाण्याचा निचरा प्रभावीपणे होत नाही व शहरात पाणी तुंबण्याचे मोठे कारण आहे . 

आयुक्तांनी मोठ्या नाल्यांना उत्कृष्ट दर्जाच्या लोखंडी स्क्रिनिंग बसविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. स्क्रिनिंग लावल्याने पाण्याच्या प्रवाहाने येणारा कचरा अडकल्यानंतर तो तातडीने स्वच्छ करून घेण्यास स्वच्छता निरीक्षकांना बजावले .  नाले व खाडीतील गाळ काढून तो थोडासा सुक्ताच उचलून घेण्यात यावा .  नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा चखपवून घेणार नाही असे बजावत कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला . अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव सह अन्य अधिकारी - कर्मचारी , ठेकेदार उपस्थित होते. 

Web Title: Commissioner's order to remove encroachments during drainage inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.