सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 07:10 PM2020-10-14T19:10:19+5:302020-10-14T19:10:33+5:30
या सर्वांना थेट रात्री 11.30 पर्यतची पूर्वीची वेळ दिल्याने कोरोनाचे सावट गेलं की काय अशी चर्चा आता पालिका हद्दीत रंगू लागली आहे.
वसई: मिशन बिगेन अगेनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वसई विरार महापालिका आयुक्तांनी आपला पूर्वीचा रात्री 9 पर्यँत चा निर्णय रद्द करीत हॉटेल,रेस्टॉरंट, बार,वाईन शॉप,दुकानं, खाद्य गृह आदीच्या वेळेबाबत चा महत्त्वाचस आदेश बुधवारी काढला असून या आदेशात चक्क पालिका आयुक्त गंगाथ र न यांनी हॉटेल व्यवसायिक साठी चक्क रेड कार्पेट च ओढवले आहे.
या सर्वांना थेट रात्री 11.30 पर्यँत ची पूर्वीची वेळ दिल्याने कोरोनाचे सावट गेलं की काय अशी चर्चा आता पालिका हद्दीत रंगू लागली आहे.
दरम्यान मंगळवारी आयुक्तांनी या विबिध खाद्य, हॉटेल व वाईन शॉप आदीच्या वेळेबाबतचा आदेश निर्गमित केला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.
या एकूणच वसई विरार महापालिकेच्या महत्त्वाच्या निर्णयाचे हॉटेल संघटना आदींनी जरी स्वागत केले असले तरी सर्वसामान्य जनतेत वेळ वाढवून दिल्यामूळ नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी काढलेल्या या नवीन सुधारित आदेशात वसई विरार शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बार, रिसॉर्ट केफे, फूड कोर्ट डायनिंग हॉल तसेच क्लब व त्याबाहेरील व परिसरातील खाद्य, व पेय युनिटस आऊटलेट ही सकाळी 8 ते रात्री 11.30 पर्यंत सुरु ठेवण्यात संमती देण्यात आली आहे.
तसेच बिअर बारव वाइन बार यांनाही सकाळी 10 ते रात्री 10.30 पर्यंत तसेच देशी दारू,किरकोळ विक्री, ताडी माडी साठी सकाळी 8 ते रात्री10 पर्यँतच्या वेळेबाबत चे महापालिकेने पत्रक जारी केले आहे. तर विशेष म्हणजे हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरात राज्य ३० सप्टेंबर २०२० रोजी उपरोक्त संदर्भ ४ च्या आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहिल. तर हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँ आणि बार सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत संमती देण्यात आली आहे. मात्र हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत लॉकडाउन सुरु राहणार असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.सोबतच कोविड19 च्या मार्गदर्शन नियमांचे तंतोतंत पालन ही करायचे आहे.