‘सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू’
By admin | Published: August 17, 2016 02:08 AM2016-08-17T02:08:40+5:302016-08-17T02:08:40+5:30
पालघर जिल्हा निर्मिती होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत.
पालघर : पालघर जिल्हा निर्मिती होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. सागरी, नागरी, व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचा आपला जिल्हा असल्यामुळे विकासकामे करतांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु या अडचणींवर नियोजनबध्द पध्दतीने मात करु न गेल्या दोन वर्षात प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदु मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयाची शाश्वत व नियोजनबध्द विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री विष्णु सवरा यांनी सोमवारी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त विष्णु सवरा यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ-९ बिल्डिंग, बिडको नाका, पालघर येथील प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालय नजीकच्या काळात आपणांस लाभणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, यासाठी पालघर तालुक्यातील पालघर, कोळगाव, खारेकुरण, नंडोरे, दापोली, टेंभोंडे व शिरगाव या सात गावात उपलब्ध असलेली सुमारे ४४० हेक्टर शासकिय जमीन जिल्हा प्रशासकीय मुख्यालय विकिसत करण्यासाठी सिडकोकडे वर्ग करण्यात येणार आहे. सिडकोकडून सदर प्रकल्पाचे काम करण्यात येणार असून यासाठी सिडको यांना पालघर नवनगर विकास प्राधिकरण घोषित करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयाचे काम सन २०१९ पर्यंत पूर्ण करणे अभिप्रेत आहे. या सर्व कामांच्या अनुषंगाने साधारणत: रु पये ३५०० कोटींची उलाढाल पालघरच्या क्षेत्रात होणार आहे. यातुन विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून पालघर जिल्हा मुख्यालयाबरोबरच पालघर शहराच्या विकासावरही भर दिला जाणार आहे. जिल्हयात कौशल्य विकास योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग व इतर क्षेत्रांमध्ये तरु णांना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
बोईसर औद्योगिक परिसरातील काही प्रमुख कंपन्या तसेच उद्योजक यांच्याशी विचार विनिमय करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते आहे.या योजनेंतर्गत मातांना दिला जाणारा आहार बालकांसाठी अमृतच ठरणार आहे.
राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे व मुलींचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारणे यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. बोईसर जवळील कांबळगाव येथील जागेवर एकलव्य क्रि डा प्रबोधिनी उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये आदिवासी ते बिगर आदिवासी जमीन विक्रीकरिता संबंधित ग्रामसभेचा ठराव घेण्याचा निर्णय माननीय राज्यपाल महोदयांच्या पुढाकाराने घेण्यात आला
आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु केली असून सन २०१९ पर्यंत प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे स्वत:चे घर असेल यादृष्टीने देखील नियोजन केले असल्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व लोकसहभाग याच्या मदतीने जिल्ह्याच्या विकासासाठी एकित्रतपणे कटीबध्द राहूया असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
(वार्ताहर)