वाडा तहसीलवर कम्युनिस्टांचा मोर्चा
By admin | Published: February 14, 2017 02:39 AM2017-02-14T02:39:10+5:302017-02-14T02:39:10+5:30
शेतकरी, शेतमजूर व असंघटीत कामगार, वनहक्क दावेदार यांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील तहसील कार्यालयावर
Next
वाडा : शेतकरी, शेतमजूर व असंघटीत कामगार, वनहक्क दावेदार यांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता.
तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. याचा असंतोष या शेतमजूर व असंघटीत कामगारात आहे. तो व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात आदिवासी बांधवांसाठीच्या जात पडताळणीच्या अटी शिथील कराव्यात या सह अनेक मागण्यांचा समावेश होता. (वार्ताहर)