विक्रमगडला २०१ आदिवासींचा सामुदायिक विवाह सोहळा
By admin | Published: March 20, 2017 01:48 AM2017-03-20T01:48:40+5:302017-03-20T01:48:40+5:30
अनेक अनिष्ट रुढी, परंपरांना फाटा देऊन व कोणतीही उधळपट्टी न करता २०१ आदिवासी जोडप्यांचे रविवारी येथे सामुदायिक विवाह थाटात संपन्न
विक्रमगड: अनेक अनिष्ट रुढी, परंपरांना फाटा देऊन व कोणतीही उधळपट्टी न करता २०१ आदिवासी जोडप्यांचे रविवारी येथे सामुदायिक विवाह थाटात संपन्न झाले.
आदिवासी समाजातील विवाह अत्यंत खर्चिक असल्याने अनेक दाम्पत्यांना तो करणे आयुष्यभर शक्य होत नाही यावर इलाज म्हणून सेवाभावी संस्थांनी साधेपणाने या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
यातील वधू-वरास संसारपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्यात. या त्याचे आयोजन भारत विकास संगम, भारत विकास परिषद व हिंदु सेवा संघ यांनीे केले होते. या कार्यक्रमास खासदार चिंतामण वनगा, हिंदु सेवा संघाचे पदाधिकारी, भारत विकास परिषदेचे पदाधिकारी, भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(वार्ताहर)