विक्रमगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:06 AM2019-05-16T02:06:45+5:302019-05-16T02:06:59+5:30
लोकसभा निवडणुकीच्या विक्रमगड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभारे यांना निवडणूक काळात मिळालेल्या वाहनांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे.
पालघर: लोकसभा निवडणुकीच्या विक्रमगड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभारे यांना निवडणूक काळात मिळालेल्या वाहनांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे. शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडविल्याने त्यांच्यावर कांरवाईची मागणी कोकण विकास मंचचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील विक्र मगड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजित कुंभारे हे काम पहात होते. त्यांना मतदारसंघातील कामे करण्यासाठी एका चालकासह गाडी पुरविण्यात येते. अशावेळी कुंभारे यांनी आपल्याला पुरविण्यात आलेल्या शासकीय वाहनांचा वापर शासकीय कामकाजात करणे अपेक्षित असताना आपल्या वाहनाचा खासगी वाहनाप्रमाणे वैयिक्तक स्वार्थापोटी दुरु पयोग करीत असल्याची तक्र ार सांबरे यांनी केला आहे.
कुंभारे हे दररोज शासनाच्या गाड्या घेऊन त्यांच्या मूळ निवासी केंद्रावर न राहता वसई-विरार येथे रोज गाडी घेऊन जात होते. खाजगी कारणासाठी वापरलेल्या गाड्यांचे भाडे आणि इंधनाचा खर्च वसूल करावा अशी मागणी तक्र ारीत करण्यात आली आहे. सदर अधिकारी आदिवासी विभागात काम करत असताना, आदिवासी विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन, शिष्यवृत्ती व इतर अनेक लोकोपयोगी काम करण्याबाबत सातत्याने टाळाटाळ करीत असल्याच्या तक्र ारी ही करण्यात आल्या आहेत.