कृष्णा घोडा यांचे स्वप्न पूर्ण करावे-ठाकूर

By Admin | Published: December 26, 2016 05:47 AM2016-12-26T05:47:30+5:302016-12-26T05:47:30+5:30

डहाणूच्या विकासात स्व. कृष्णा घोडा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले होते.

Complete the dream of Krishna Ghoda - Thakur | कृष्णा घोडा यांचे स्वप्न पूर्ण करावे-ठाकूर

कृष्णा घोडा यांचे स्वप्न पूर्ण करावे-ठाकूर

googlenewsNext

डहाणू : डहाणूच्या विकासात स्व. कृष्णा घोडा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले होते. कृ ष्णा घोडा यांचे कार्य अविस्मरणीय आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अमित घोडा यांना संधी मिळाली आहे. त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे विचार आमदार आनंद ठाकूर यांनी शनिवारी रानशेत येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
डहाणूच्या अनुसया परिचर्या महाविद्यालय, रानशेत या प्रशिक्षण संस्थेचा सहावा वर्धापन शनिवारी दुपारी संस्थेच्या प्रांगणात मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. स्व. कृष्णा घोडा यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिलिप घोडा तसेच पालघर मतदार संघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार आनंद ठाकूर, शिवसेनेचे उपनेते व सभापती रविंद्र पागधरे, आदिवासी सेवक अप्पा भोये, रानशेतच्या सरपंच भारती बोलाडा, सामाजिक कार्यकर्ते रमेश कर्णावर, राजेश घोडा, नरेश आहाडी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष वझे, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराज रामअप्पा, सचिव सुदाम पाटील, महेंद्र पाटील तसेच परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, सरपंच व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनुसया परिचर्या महाविद्यालयातील चाळीस प्रशिक्षणार्थी पैकी ३८ जण शासकीय सेवेत दाखल होणार असल्याने या प्रशिक्षणार्थी परिचर्याना शपथ देण्यात आली. तसेच यावेळी प्रथम व्दितीय आणि तृतीय वर्षात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अधिक्षिका चेतना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)

Web Title: Complete the dream of Krishna Ghoda - Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.