पहिल्या टप्प्यातील शौचालये पूर्ण

By admin | Published: February 20, 2017 05:18 AM2017-02-20T05:18:05+5:302017-02-20T05:18:05+5:30

जव्हार नगर परिषदमार्फत हागणदारीमुक्तसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू असून शासनाने दिलेल्या पहिल्या टप्प्यात

Complete the toilets of the first phase | पहिल्या टप्प्यातील शौचालये पूर्ण

पहिल्या टप्प्यातील शौचालये पूर्ण

Next

हुसेन मेमन / जव्हार
जव्हार नगर परिषदमार्फत हागणदारीमुक्तसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू असून शासनाने दिलेल्या पहिल्या टप्प्यात २८३ वैयक्तीक शैचालयां पैकी २५६ शैचालयाची बांधणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे जव्हार लवकर हांगणदारी मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे.
२००१ च्या जनगणने नुसार प्रथम शासनाने २८३ वैयक्तीक शैचालय मंजूर करून प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांप्रमाणे मंजूर केले असुन उर्वरीत पाच हजार रुपये नगर पालिकेकडून देऊन एकूण रू. १७०००/- प्रमाणे शैचालय मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, पालिकेकडे वैयक्तीक शौचालयाची ५५० अर्ज आलेली आहेत. त्यामुळे शासनाने २०१५ मध्ये न. पा. शिक्षकामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ५५० शैचालाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. या करीता पालिकेने शासनाकडे उर्वरीत २२५ शैचालय बांधण्याकरीता निधीची मागणी केलेली आहे. त्यामुळे लवकरच उर्वरीत शैचालय बांधण्यात येतील असे आश्वासन जव्हार नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैव विधाते यांनी सांगितले.
होणार फौजदारी कारवाई
अजुनही सुधारणा होत नसल्याने जव्हार नगर परिषद गेल्या काही दिवसांपासून पहाटे ५ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत शहरातील सर्वच गस्त वाहनांद्वारे नागरिकांना आवाहन करीत आहे. पालिकेकडून उघडयावर शौचास बसण््यास प्रबंध लावण्यात आले आहेत. जर कुणी असे आढळले तर त्या व्यक्तीचे रेशनकार्ड, मतदान कार्ड जप्त करून त्या व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशी दवंडी देत सकाळी पालिकेचे कर्मचारी फिरून नागरिकांना आवाहन करीत आहेत.

सार्वजनिक शैचालयाचे दुष्परिणाम
 पालिका सार्वजनिक शौचालयाच्या दुरूस्तीकडे जास्त वळलेली आहे. एकीकडे शासन घरोघरी शौचालयाचा नारा देत असतांना जव्हारमध्ये मात्र सार्वजनिक शौचालयाकडे भार टाकला जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
 सार्वजनिक शौचालयामध्ये लोकसंख्येचा विचार केला गेला नाही. त्यामुळे तीन किंवा चार शिटच्या शौचालयात एका वेळी ८ ते १० लोक शौचालयाकरीता येता. मात्र ही नैसिर्गक प्रक्रि या असल्यामुळे कोणाला थांबवणे शक्य होते तर कोणाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. तसेच सार्वजनिक शौचालयाची इतरही दुष्परीणाम आहेत.
 सार्वजनिक असल्यामुळे त्याची दररोज साफ सफाई होत नाही, सेफ्टी टाकी फूल्ल होऊन परीसरात दुर्गधी पसरते त्यामुळे पालिकेने वैयक्तीक शौचालयाकडे जास्ती जास्त ज़र देऊन प्रत्येक घरी शौचालय अशी आखणी करून सव्हेक्षण करून घराघरात शौचालय असण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Complete the toilets of the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.