पोटनिवडणुकीत संमिश्र यश; माकप ६, भाजप ६, तर मनसे १ जागी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 06:32 IST2019-12-09T23:33:20+5:302019-12-10T06:32:48+5:30
ग्रामपंचायतीच्या १३ जागांपैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या तर आठ जागांसाठी निवडणूक होऊन त्याची मतमोजणी सोमवारी झाली.

पोटनिवडणुकीत संमिश्र यश; माकप ६, भाजप ६, तर मनसे १ जागी विजयी
तलासरी : तलासरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी तलासरी तहसील कार्यालयात झाली. यामध्ये माकप ६, भाजप ६ तर मनसेने एका जागेवर विजय मिळविला आहे.
ग्रामपंचायतीच्या १३ जागांपैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या तर आठ जागांसाठी निवडणूक होऊन त्याची मतमोजणी सोमवारी झाली. या निवडणुकीत भाजपला सहा जागा, माकपला सहा जागा तर मनसेला एक जागेवर विजय मिळाला.
बिनविरोध विजयी उमेदवार :
१) अहिर जसु नटू (संभा), २) संजय लहाणू शिंगडा (सावरोली अनवीर),
३) रंजना दशरथ विलहात (झरी), ४) भिवा जेठ्या चिमोडिया (झरी), ५) बबलू रघू बारात (झरी)
निवडणुकीत विजयी उमेदवार :
१) भारती आंतोन नारले (करंज गाव),
२) सचिन गुरोडा (आमगाव अच्छाड),
३) जयवंती भारत रांध्ये (सूत्रकार),
४) सचिन मोहन बेंदर (सूत्रकार),
५) चंद्रकांत रडका दुमाडा (सूत्रकार),
६) अलका वाज्या बेंडगा (सूत्रकार),
७) नीलम जेठ्या रायात (सूत्रकार),
८) प्रतिमा महादेव गोवारी (गोवारी)