वसई-विरार शहरांमधील सुविधा सुधारण्याचा केला संकल्प; मूलभूत सेवा-सुविधांचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:23 PM2020-01-11T23:23:41+5:302020-01-11T23:23:52+5:30

आगामी काळात महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी परिवहन विभागाची बससेवा देण्यासाठी योजना आखली जात आहे.

The concept of improving facilities in Vasai-Virar cities | वसई-विरार शहरांमधील सुविधा सुधारण्याचा केला संकल्प; मूलभूत सेवा-सुविधांचा विस्तार

वसई-विरार शहरांमधील सुविधा सुधारण्याचा केला संकल्प; मूलभूत सेवा-सुविधांचा विस्तार

Next

मंगेश कराळे

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेने आरोग्य, परिवहन, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये २०२० साली सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या वर्षी महानगरपालिका नागरिकांच्या गरजेप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे मूलभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. मागील वर्षी महानगरपालिकेपर्यंत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल अधिकारी व कर्मचारी घेत असून ते आता तक्रारदारांपर्यंत पोहचत आहेत. यामध्ये खुद्द महापौर हेही सामील झाले असून वसई, विरार, नालासोपारा, नायगाव ही महानगरपालिकेच्या हद्दीमधील शहरे आणि गावे सुधारण्याचा संकल्पच केला असल्याची माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत करताना दिली.

महापौरांनी सांगितले की, मी स्वत: व्यक्तिगत वसई-विरार शहरांमधील गल्लीबोळात, चाळी आणि झोपडपट्टी परिसरात जाऊन तिथे असलेल्या सुविधांची माहिती घेत आहे. ज्या ठिकाणी असुविधा दिसून येत आहेत, त्या ठिकाणी लवकरात लवकर सुधार करून तेथील नागरिकांना सुविधा कशा उपलब्ध होतील याबाबत प्रयत्न करत आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते त्या परिसरात, रस्त्यावरील अतिक्र मणे, फेरीवाला झोन, रिक्षा स्टँड याचप्रमाणे यांच्याशी निगडित समस्यांवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी लवकरच या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी महापालिका काय प्रयत्न करीत आहे, असे विचारले असता महापौर प्रवीण शेट्टी म्हणाले की, वसई-विरारमधील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक व अत्यावश्यक उपकरणे लवकरच उपलब्ध केली जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये येणाºया रुग्णांची उत्तमपणे देखभाल केली जाईल. हॉस्पिटलमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध केले जाणार. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांचे पदे रिक्त आहेत ती पदे भरली जातील. आमचा प्रयत्न असणार आहे की, या ठिकाणी राहत असलेल्या रु ग्णांना मुंबई, ठाणे किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी जावे लागणार नाही. शहरातील रस्त्यावरील अतिक्र मणाबाबत विचारले असता महापौरा म्हणाले की, वसई तालुक्यातील रस्त्यांवर झालेल्या अतिक्र मणापासून लवकरच सुटका होणार आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढणार

वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात सध्या फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. याविषयी महापौरांनी सांगितले की, फेरीवाल्यांनाही लवकरच त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध केली जाणार आहे. शहरातील वाहतुकीची सर्वात मोठी समस्या रिक्षा स्टँडमुळे होत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, विविध युनियनचे अध्यक्ष, समाजसेवक तसेच नागरिकांशी चर्चा केली जाणार आहे.

परिवहन सेवा सुधारण्याबाबत महापालिका काय प्रयत्न करीत आहे, असे विचारले असता महापौर म्हणाले की, वसई-विरारमधील नागरिकांना परिवहन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आगामी काळात महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी परिवहन विभागाची बससेवा देण्यासाठी योजना आखली जात आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधून मदतीचे प्रयत्न करणार आहे.

Web Title: The concept of improving facilities in Vasai-Virar cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.