स्फोटकांमुळे चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:03 AM2019-03-07T00:03:15+5:302019-03-07T00:03:19+5:30

विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू माफियांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने संपूर्ण वसई तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Concerns caused by explosives | स्फोटकांमुळे चिंता वाढली

स्फोटकांमुळे चिंता वाढली

Next

नालासोपारा : विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू माफियांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने संपूर्ण वसई तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि विरार पोलिसानी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या अड्ड्यावर छापा घालून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १२३ जिलेटीनच्या कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या ३४५ आणि सेफ्टी फ्जुजचे २१ बंडले जप्त करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सापडलेली ही स्फोटके कुठून आणली, कशा प्रकारे त्यांची विक्र ी होते याचा आम्ही शोध घेत असल्याचे माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली आहे.
विरार मध्ये सापडलेली स्फोटके ही वाळू उपशाच्या कामासाठी वापरली जात होती. खाडीच्या तळाशी असलेली वाळू स्फोट करून सैल करायची आणि मग ती उपसली जात होती. वाळू उपसाही बेकायदेशीर आणि स्फोटकांचा वापरही बेकायदेशीर आणि धोकादायक आहे, या प्रकरणाचा आम्ही शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
>गैरवापर झाल्यास हानी
एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडलेली स्फोटके विध्वसंसाठी पुरेसी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
या स्फोटकांचा गैरवापर झाला तर मोठी हानी होऊ शकते असे खुद्द पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Concerns caused by explosives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.