कणेर-वैतरणा रस्त्यासाठी संघर्षाचा इशारा
By admin | Published: June 25, 2016 01:23 AM2016-06-25T01:23:35+5:302016-06-25T01:23:35+5:30
तब्बल दोन वर्षांपूर्वी मंजूरी मिळून २५ कोटीची तरतूद करण्यात आली असतानाही कणेर-वैतरणा रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही
विरार : तब्बल दोन वर्षांपूर्वी मंजूरी मिळून २५ कोटीची तरतूद करण्यात आली असतानाही कणेर-वैतरणा रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. पहिल्याच पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यावर चिखल साचून अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे संतापलेल गावकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेने रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कणेर फाटा ते वैतरणा स्टेशन व वैतरणा स्टेशन ते कोशिंबे गाव रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यांवरून दिवस-रात्र शेकडो ट्रक रेती वाहतूक होत असल्याने रस्त्यांची अवस्था दनिय झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील लोकांनी मागणी लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेने रस्त्याच्या कामांना मंजूरी देऊन २५ कोटी रुपयांची तरतूदही केली होती. १९ नोव्हेंबर २०१४ च्या महासभेत रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली गेली होती. मात्र, त्यानंतर अद्यापर्पंत रस्त्याचे काम सुरु न झालने गावकरी संतापले आहेत.
पावसाने आता रस्त्यात खड्डे पडले असून चिखल साचला आहे. विद्यार्थी, महिला, वृद्धांना जीवघेण्या रस्त्यावरून चालणेही जिकीरीचे होऊन बसले आहे, असा आरोप शिवसेनेचे विरार शहर प्रमुख दिलीप पिंपळे यांनी केला आहे. त्यासाठी आता शिवसेना आंदोलन सुरु करणार असून चिखलम रस्त्यावर फुटबॉलचे सामने भरवून त्याच उद्घाटनाला आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले जाणार आहे, असेही पिंपळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)