गोंधळात झाला शिक्षक गुणगौरव सोहळा
By admin | Published: October 20, 2015 11:35 PM2015-10-20T23:35:34+5:302015-10-20T23:35:34+5:30
वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात आयोजिलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शिक्षक तसेच त्यांच्या नातेवाईकाचा
वाडा : वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात आयोजिलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शिक्षक तसेच त्यांच्या नातेवाईकाचा सभागृहात गोंधळ तर प्रशासनाचे ढिसाळ नियोजन दिसून आले. या कार्यक्रमासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे उपस्थित होते. मात्र जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक वगळता तालुका पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार न दिल्याने संबंधितांनी नाराजी व्यक्त केली.
मनिषा जाधव, रमेश शेलार, किसन सोनावणे, महेंद्र पवार, रामेश्वर पाटील, जनार्दन पाटील, रंजिता घागस, आकांक्षा हरड, संजय सांबरे, जगदीश जाधव, गुरूनाथ लहांगे, अर्जुन कोदे, भगवान मेघवाले, रवींद्र तरे आणि संतोष पाटील या शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या स्वरा पाटील हिचा विष्णू सवरा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास वाडा पंचायत समितीचे सभापती अरूण गौंड, उप सभापती नंदकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते निलेश गंधे, जि. प. सदस्य भालचंद्र खोडके, किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, माधुरी पाटील, मेघना पाटील, शामा गायकर, अश्विनी शेळके, गटविकास अधिकारी निखिल ओसवाल, वाड्याचे सरपंच उमेश लोखंडे, उपसरपंच रोहन पाटील, मनसेचे गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)