नालासोपाऱ्यात गर्दुल्यांचा सुळसुळाट; अनेकदा कारवाई करूनही अंकुश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:51 PM2019-07-24T22:51:42+5:302019-07-24T22:52:12+5:30
नगरसेवकांचे पोलिसांना निवेदन
नालासोपारा : शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम परिसरात सध्या गर्दुल्यांचा सुळसुळाट आहे. तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात या गर्दुल्यांचा अनेक तक्रारी दररोज येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी वेळीच या गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा या परिसरात सेंच्युरी लोटस परिसर, लिटिल फ्लावर शाळेच्या मागील मोकळे मैदान, सम्राट कॉर्नर परिसर, श्रीप्रस्थाकडे जाणाºया सुमसाम रस्त्यावर गर्दुल्यांचे टोळके संध्याकाळी ७ च्या सुमारास असतात. मुलींना छेडणे, मारामारी करणे, दादागिरी करणे अशा घटना घडत असून अनेक ठिकाणी चोºया देखील होतात. यामुळे नगरसेवक राजू ढगे आणि ३० ते ४० कार्यकर्त्यांसह स्थानिकांनी सोमवारी संध्याकाळी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.
नालासोपाºयात अनेक ठिकाणी ब्राऊन शुगर, गांजा, चरस विकणाºया टोळ्या कार्यरत असून ते विकत घेण्यासाठी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, मुंबई येथून नालासोपारा शहरात अनेक तरुण येतात. पोलिसांनी कारवाई करूनही ते यावर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत. नालासोपारा शहरात विविध ठिकाणी लिक्विड स्वरूपात ड्रग्सची तस्करी देखील केली जात असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी ठरलेली असताना तुटपुंज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवावर या गर्दुल्यांचा हटवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या गर्दुल्यांच्यामुळे रात्री रस्त्यावरून एकट्याला चालण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
समेळ पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दुल्यांचा वावर वाढला असून वेळीच यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिले आहे. आमच्या प्रभागात बाहेरून 15 ते 18 वयोगटातील अनेक तरु ण नशा करण्यासाठी येतात. चोरीच्या घटनांमध्ये ही वाढ झालेली आहे.
- राजू ढगे, (नगरसेवक, समेळ पाडा,नालासोपारा)
गर्दुल्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले असून ज्या ज्या परिसरात हे धंदे होत आहेत त्याठिकाणी पेट्रोलिंग वाढवली जाणार आहे. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दररोज संध्याकाळी सर्व परिसरात पेट्रोलिंग करून पिंजून काढणार आहे. मी स्वत: सुद्धा पेट्रोलिंगला जाणार आहे. - वसंत लब्दे (पोलीस निरीक्षक, नालासोपारा)
कुठे कुठे गर्दुल्यांचा ठिकाणा....
पूर्वेकडील परिसरात अलकापुरी, प्रगती नगर, सेन्ट्रल पार्क, ओस्तवाल नगरी, गालानगर, शिर्डी नगर, आचोळे डोंगरी तर पश्चिमेकडे हनुमान नगर, श्रीप्रस्था चौथा रोड, सेक्रेड हार्ट शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात, समेळ पाडा याठिकाणी संध्याकाळी व रात्रीच्या सुमारास गर्दुल्यांचा वावर दिसत आहे.
गर्दुल्यांचा अडडा बनला भंगार गाडया.....
शहरातील अनेक रस्त्यांच्या किनाºयालगत मोठ्या भंगार वाहनात गर्दुल्यांचा अड्डडा बनला आहे. रात्रीच्या वेळी याच गाड्यांमध्ये बसून गर्दुल्ले नशा करतात. रात्रीच्या वेळी ते येणाºया जाणाºया लोकांना लुटतात. जर विरोध केला तर नशेच्या धुंदीत ते जीवघेणा हल्ला करण्यास मागेपुढेही पाहत नाही. वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यात गर्दुल्यांकडून चोºया आणि मारामारीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत.