पालघरमध्ये काँग्रेसचा मोर्चा

By admin | Published: July 9, 2015 11:34 PM2015-07-09T23:34:46+5:302015-07-09T23:34:46+5:30

भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते

Congress Front in Palghar | पालघरमध्ये काँग्रेसचा मोर्चा

पालघरमध्ये काँग्रेसचा मोर्चा

Next

पालघर : भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते. मात्र चिक्की घोटाळा, बोगस पदव्या घोटाळा, व्यापम घोटाळा प्रकरणामुळे भाजप सरकारचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडला पडला असल्याची टीका माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी आज केली.
पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युती शासनाच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार व ज्वलंत समस्या उभ्या राहत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढत असल्याने या सर्व समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासठी पालघर रेल्वेस्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, मायकल फुटयार्डो, मोहन शर्मा, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, सुरेंद्र शेट्टी, पांडुरंग बेलकर, विश्वास पाटील, निलेश राऊत इ. मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्र्रकरणात मोठी वाढ होत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पीककर्जाचा पहिला हप्ता मे महिन्यात मिळणे अपेक्षित असताना तो अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच आघाडी सरकारने बंद केलले लोडशेडींग युती सरकारने पुन्हा सुरू केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शासनाने या संदर्भात तत्काळ उपाययोजना आखाव्यात, आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर युती सरकारने पालघर जिल्ह्याला सोयीसुविधा पुरविण्यात चालढकल केली आहे. नोकर भरतीत स्थानिकांना संधी द्यावी, पालघरचा बिल्डरधार्जिणा प्रारुप विकास आराखडा रद्द करावा , तारापूर अणुशक्ती केंद्रातून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, आयटीआयमधून शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक सवलत पुन्हा सुरु करावी, सातपाटी, नवापूर, मुरबे, दांडी इ. खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी बंद करावे व त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, इ. मागण्यांसाठी काढलेल्या या मोर्चात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Congress Front in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.