महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन, मोदी सरकारचा निषेध; कुठे बैलगाडी, तर कुठे बैलजोडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:54 AM2017-09-26T03:54:49+5:302017-09-26T03:55:22+5:30
भाजपा प्रणित केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, आणि गॅसच्या किमती प्रचंड वाढविल्याचा व महागाईचा निषेध करण्यासाठी डहाणू तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयावर घोडा गाडी, बैल गाडी मोर्चा माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
डहाणू : भाजपा प्रणित केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, आणि गॅसच्या किमती प्रचंड वाढविल्याचा व महागाईचा निषेध करण्यासाठी डहाणू तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयावर घोडा गाडी, बैल गाडी मोर्चा माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
रेल्वे स्थानकापासून तहसील कार्यालयावर निघालेल्या घोडागाडी, बैलगाडी, मोर्चात तालुका अध्यक्ष पांडुरंग बेलकर, शहर अध्यक्ष मोइन शेख, अशोक माळी, महिला अध्यक्षा राजश्री अहिरे, कासीम मुछाले आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिष्टमंडळा तर्फे तहसीलदार राहुल सारंग याना निवेदन देण्यात आले, केंद्र सरकारने आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पेट्रोल, डिझेलचे भाव काँग्रेस राजवटी पेक्षा तिपटीने कमी असतांना सतत भाव कमी करण्याऐवजी मनमानीने भाववाढ करुन सामान्य माणसांचे कंबरडे मोडले असा आरोप राजेंद्र गावित यांनी करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. एकीकडे महागाई भडकलेली असतांना त्यात नोटाबंदीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीची भर पडल्याने जनतेचे हाल होत आहेत, अशी टीका झाली.