CoronaVirus News: परवानगीशिवाय मुख्यालयाचे बांधकाम, सुपरवायझरचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:39 AM2020-05-02T01:39:35+5:302020-05-02T01:39:53+5:30

मुख्य ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पालघर पोलिसांनी एका सुपरवायझरवर गुन्हा दाखल करुन बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

Construction of headquarters without permission, victim of supervisor? | CoronaVirus News: परवानगीशिवाय मुख्यालयाचे बांधकाम, सुपरवायझरचा बळी?

CoronaVirus News: परवानगीशिवाय मुख्यालयाचे बांधकाम, सुपरवायझरचा बळी?

Next

हितेन नाईक 
पालघर : पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी न घेता नवी मुंबईतून कामगारांना आणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्य ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पालघर पोलिसांनी एका सुपरवायझरवर गुन्हा दाखल करुन बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
पालघर मुख्यालयाच्या इमारतीचे काम सहा वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. लॉकडाऊनमुळे एक महिन्यापासून हे काम बंदच होते. पावसाळ्याच्या आत हे काम पूर्ण करणे महत्त्वाचे असल्याने पालघर सिडको कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांनी कामाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयास ईमेलद्वारे परवानगी पाठवली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामाची परवानगी ठेकेदार प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लि. यांना तर इंटेरिअर डेकोरेटरचे काम डेकोर होम इंडिया प्रा.लि. यांना दिली होती. जिल्हा परिषद इमारतीचे काम स्प्रेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांना तर इंटेरिअर डेकोरेटरचे काम लीना पॉवरटेक इंजिनीअर्स लि. यांना, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे काम हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांना तर इंटेरिअरचे काम लीना पॉवरटेक इंजिनीअर्स लि. यांना, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या इमारतीचे व व्हीआयपी बंगल्याचे काम वसंत कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, इंडिया यांना देण्यात आले होते. अन्य कामे मे. व्ही.बी. भोईर यांना दिल्याने त्यांनी कामाची परवानगी १७ एप्रिल रोजी दिली होती. कामावरील कर्मचाºयांची दिवसातून दोन वेळा तपासणी करावी; कामगार, वाहनांची नोंद पोलीस ठाण्यात करावी, अल्प मनुष्यबळाचा वापर करावा, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्या निदर्शनास आले. मुंबईमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना ठेकेदाराने परवानगीशिवाय दोनवेळा नवी मुंबईहून कामगारांची वाहतूक केल्याचे तहसीलदारांना कळले. त्यांनी कारवाईचे आदेश पालघर पोलिसांना दिल्यानंतर ठेकेदाराऐवजी धर्मेश पटेल नामक सुपरवायझरवर गुन्हा दाखल करून बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तपासात ठेकेदाराचा सहभाग दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करु, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.

Web Title: Construction of headquarters without permission, victim of supervisor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.