वालिव नाईकपाड्यातील बोअरवेलला दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:58 AM2017-08-02T01:58:06+5:302017-08-02T01:58:06+5:30
वालीव परिसरातील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलमिश्रित पांढºया रंगाचे दूषित पाणी येऊ लागले आहे. दोन दिवसांपासून हा प्रकार सुरु
वसई : वालीव परिसरातील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलमिश्रित पांढºया रंगाचे दूषित पाणी येऊ लागले आहे. दोन दिवसांपासून हा प्रकार सुरु असूनही महापालिका अथवा महसूल खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वसई विरार परिसरात सध्या अ़नेक भागात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यातच वालीव येथील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलयुक्त पांढºया रंगाचे दुषित पाणी येऊ लागल्याने नागरीक चिंतेत सापडले आहेत. या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल हाच एकमेव पर्याय आहे. या परिसरात दोनशेहून अधिक केमिकल कोटींग, मशीन डायच्या कंपन्या आहेत. शेजारीच मोठा नाला आहे. या कंपन्यांतील केमिकलयुक्त सांडपाणी या नाल्यात सोडले जाते. त्यामुळे येथील विहीरी आणि बोअरवेलचेही पाणी दूषित होऊ लागले आहे. या बोअरवेलचे पाणीही त्याचमुळे दूषित झाल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
या परिसरात पिण्याचे बाटलीबंद पाणी पुरवठा करणारे प्लँट आहेत. त्यामध्ये याच बोअरवेल आणि विहीरीचे पाणी वापरले जाते. त्यावर थातुरमातून प्रक्रिया करुन वसई विरार परिसरात तेच पाणी विकले जाते.
टँकर लॉबी आजही दुषित पाणी विकत असून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना आंदोलन करील ्असा इशारा शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी तहसिलदारांना भेटून दिला आहे.