वर्षभरात ९०८ आगींवर नियंत्रण, वसई-विरार अग्निशमन दलाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 01:59 AM2020-01-26T01:59:05+5:302020-01-26T01:59:13+5:30
वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग हा सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे.
वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्येचा वेग आणि त्यापाठोपाठ निर्माण होणाऱ्या बांधकामांचा वेग मोठा आहे. साहजिकच वसई-विरारमध्ये वर्षभरात लागणाºया आगींच्या घटनांचाही वेग मोठा आहे. मागील वर्षभरात वसई-विरारमध्ये लागलेल्या तब्बल ९०८ आगींवर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी ही कामगिरी केली.
वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग हा सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे. चारचाकी अवजड वाहनांबरोबरच आग विझवण्यासाठी उपयोगी ठरणाºया मोटारसायकलही या विभागाकडे तैनात आहेत. यामुळे या विभागाची क्षमता वाढली आहे. कोठेही आग लागली की काही क्षणांत अग्निशमन विभागाचे जवान त्या ठिकाणी हजर होतात. या संदर्भातील माहिती घेतली असता मागील वर्षभरात वसई-विरार शहरात लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी मोठी कामगिरी बजावली आहे.
अग्निसुरक्षेसंदर्भात योग्य खबरदारी नाही
वसई-विरार परिसरात रहिवाशी संकुलांबरोबरच औद्योगिक वसाहती, व्यापारी दुकाने तसेच प्रशस्त अशी बांधकामे आहेत. काही चित्रपट, मालिकांचे २४ तास चित्रीकरण चालेल असे स्टुडिओ आहेत. यातील बºयाच ठिकाणी अग्निसुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी नसल्याने बºयाचदा आगीसारख्या घटना उद्भवतात. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत.