Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 09:23 PM2021-06-15T21:23:15+5:302021-06-15T21:23:41+5:30

परदेशात जाणाऱ्या साठी कॉव्हीशिल्ड लसीचा दुसऱ्या डोस साठीचा कालावधी केला 84 वरून 28 दिवसांवर 

Corona Vaccination: Foreigners going to Vasai-Virar on Wednesday will get second dose of Covishield | Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस

Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस

googlenewsNext

आशिष राणे

वसई - विरार शहरातील विद्यार्थी व नोकरी निमित्ताने परदेशी जाणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कॉव्हीशिल्ड लशीच्या दुसऱ्या डोसाचे उद्या दि 16 जून रोजी अग्रवाल लसीकरण केंद्र गोलानी नाका वालीव येथे   लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली. अधिक माहीती नुसार,शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे

तर दि.16 जून, 2021 रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या व्यक्ती, टोकियो ऑलम्पिक स्पर्धेसाठी जाणारे खेळाडू व त्यांच्या सोबतचे कर्मचारी तसेच समुद्री जहाजांवर काम करणारे भारतीय 'सीफेरर्स 'यांचे ‘कोविशिल्ड’ लसीच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण अग्रवाल कोविड-19 लसीकरण केंद्र  गोलानी नाका, वालीव, वसई (पू) येथे केलं जाणार आहे. दरम्यान आता कॉव्हीशिल्ड साठी 84 दिवसाची मुदत 28 दिवसावर केली 

शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सदर परदेशी प्रवास करणाऱ्या लाभार्थ्यांचा ‘कोव्हीशिल्ड’ लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत असणारा 84 दिवसांचा कालावधी कमी करून तो 28 दिवसांचा करण्यात आला असून त्याअनुषंगाने को-विन अँपमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.  त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा दुसरा डोस तसेच 45  वर्षे व 45  वर्षावरील वयोगटातील लाभार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा दुसरा डोसचे लसीकरणही अग्रवाल कोविड-19 लसीकरण केंद्र  गोलानी नाका, वालीव, वसई (पू) येथे केलं जाईल

आणि उद्या पासून लसीकरण बंद 

सद्यस्थितीत शासनाकडून महानगरपालिकेला पुरवण्यात आलेला लसींचा साठा संपल्यामुळे दि.16 जून, 2021 रोजीपासून ते पुढील आदेश होईपर्यत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वरील लसीकरण केंद्र वगळता इतर सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण पूर्णतः बंद राहील असे ही वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे 

Web Title: Corona Vaccination: Foreigners going to Vasai-Virar on Wednesday will get second dose of Covishield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.