Corona Vaccination: वसई-विरारमध्ये ऑनलाइन नोंदणी करूनही वृद्धाला व्हॅक्सिन देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:46 AM2021-04-04T01:46:30+5:302021-04-04T07:01:13+5:30

Corona Vaccination: ॲपचा घोळ; महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार

Corona Vaccination Refusal to vaccinate the elderly despite online registration in Vasai-Virar | Corona Vaccination: वसई-विरारमध्ये ऑनलाइन नोंदणी करूनही वृद्धाला व्हॅक्सिन देण्यास नकार

Corona Vaccination: वसई-विरारमध्ये ऑनलाइन नोंदणी करूनही वृद्धाला व्हॅक्सिन देण्यास नकार

Next

- मंगेश कराळे

नालासोपारा : १० दिवसांपूर्वी नोंदणी करून ठरवून दिलेल्या वेळेत कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या एका ७८ वर्षीय वयोवृद्ध नागरिकाला पालिकेच्या आरोग्य विभागाने व्हॅक्सिन देण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. नालासोपारा पूर्वेकडे राहणारे प्रेमसिंग सभापती (७८) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. 

सभापती यांनी शासनाच्या आरोग्य सेतू अंतर्गत कोरोना लस घेण्यासाठी १० दिवसांपूर्वी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्या वेळी त्यांना १ एप्रिलला लस घेण्याची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ते लस घेण्यासाठी पालिकेच्या नगीनदासपाडा येथील तुळींज हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी दाखवून लसीची मागणी केली असता, आम्ही ऑनलाइन नोंदणी मानत नाही. तुम्ही परवा सकाळी ७ वाजता येऊन नंबर लावा, असे तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगून व्हॅक्सिन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

सकाळपासून ताटकळत बसलेल्या सभापती यांनी अखेर डॉ. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, मी कामात आहे. काम आटोपल्यावर चौकशी करते, असे सांगून त्यांना टाळले. त्यामुळे सभापती यांनी पुन्हा लसीकरणाच्या ठिकाणी मागणी केली असता, आमचा स्टॉक संपला आहे, असे उत्तर त्यांना देण्यात आले. 

अखेर प्रेमसिंग सभापती निराश होऊन परतले घरी  
लस न मिळाल्याने निराश होऊन प्रेमसिंग सभापती घरी परतले. यानंतर त्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी म्हणून शासनाकडून आवाहन आणि ऑनलाइन नोंदणी सुरू केली असताना प्रत्यक्षात मात्र ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विभागाकडून वेगळीच वागणूक दिली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर लसीकरणासाठी १ एप्रिल ही तारीख देण्यात आली होती. त्यामुळे तुळींज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लस तर मिळाली नाहीच, उलट ऑनलाइन नोंदणी मानत नसल्याचे उत्तर देऊन पिटाळून लावले. 
- प्रेमसिंग सभापती, नागरिक

ऑनलाइन व्हॅक्सिन घेण्यासाठी असलेल्या ॲपचा घोळ आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना लस देणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही त्याची माहिती पाठवा, मी याची चौकशी करते. 
- डॉ. सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई महानगरपालिका.

Web Title: Corona Vaccination Refusal to vaccinate the elderly despite online registration in Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.