coronavirus: वसई तालुक्यात 127 दिवसांत आढळले 10 हजार 09 करोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:07 PM2020-07-19T15:07:47+5:302020-07-19T15:08:17+5:30
वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250 रुग्ण आढळून येत आहेत.
वसई - वसई तालुक्यातील शहरी भागातील वसई विरार शहर महानगरपालिका व वसईचा ग्रामीण भाग मिळून आजवर करोना बाधित रुग्णांची संख्या 18 जुलै पर्यँत शनिवारी 10 हजारावर पोहोचली आहे. 13 मार्च 2020 रोजी वसई शहरात कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत जाऊन एप्रिल- मे -जून आणि आता जुलै दि.18 जुलै रोजी म्हणजेच 127 दिवसांनी शहरी व ग्रामीण भाग मिळुन कोरोनाची रूग्णसंख्या 10 हजार 9 एवढी झाली आहे. वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250 रुग्ण आढळून येत आहेत.
मात्र आपण या 127 दिवसांची सरासरी प्रतिदिन आकडेवारी चा अभ्यास केला तर शहरी भागात 78 व ग्रामीण भागात 3 असे काहीसे त्याचे वाढते पण कमीअधिक प्रमाण आहे. 18 जुलै शनिवारी वसई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजार 9 एवढा झाला. त्यात वसई विरार महापालिका हद्दीतील 9 हजार 576 आणि वसई ग्रामीण परिसरातील 433 रुग्णांचा समावेश आहे.
मुक्त प्रमाण पाहिलं तर आतापर्यंत शहरातील 6 हजार 552 रुग्ण करोनामुक्त झाले असून 189 रुग्णांचा बळी गेला आहे तर ग्रामीण भागात देखील 10 मृत्यू झाले आहेत त्यामुळे एकूणच हा मृत्यूदर या बाधित रुग्णसंख्येच्या 1.99 % वर आहे त्यात सध्या वसई शहरात 3 हजार 258 रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.