coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीत 277 रुग्ण कोरोनामुक्त, तर 224 नव्या बाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 12:10 AM2020-07-05T00:10:32+5:302020-07-05T00:11:08+5:30
पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 5 हजार 959 वर पोहचली आहे,
वसई -विरार शहरात शनिवारी सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक असे 277 रूग्ण यांना घरी सोडण्यात आले असून ही बाब दिलासादायक ठरली आहे.
तर 224 रूग्ण हे कोरोना बाधित म्हणून आढळून आले असल्याने शहरावर रूग्ण वाढीची टांगती तलवार मात्र कायम आहे.यात नालासोपारा पूर्व पश्चिम भागातील 2 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.
विशेष म्हणजे त्यात जुन महिन्यातील बहुतांश रुग्ण व त्यांच्या इतरत्र रुग्णालयातील नोंदीची चौकशी वजा फेरतपासणी केली असता त्यात तब्बल 898 रुग्णाची वाढ झाल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले असल्याने आता शहरात पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 5 हजार 959 वर पोहचली आहे,
तर दिवसभरात रेकोर्ड ब्रेक असे 277 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान शनिवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 224 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये वसई- 98 नायगाव - 9 वसई-विरार- 2 नालासोपारा- 76 आणि विरार- 39 तसेच एकूण 132 पुरुष व 92 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.
तर पालिका हद्दीत शनिवारी 2 रुग्णाचा मृत्यू !
वसई -विरार मध्ये नालासोपारा पूर्व व पश्चिम भागातील 2 रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 126 इतकी झाली आहे .
एकूणच शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने ही बाब पालिकेच्या दृष्टीने महाचिंतेची बनून राहिली आहे.
दिलासादायक ; वसई विरार शहरात रेकॉर्ड ब्रेक 277 रूग्ण घरी परतले !
वसई विरार मनपा हद्दीत शनिवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 277 रूग्ण आपापल्या घरी परतले त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2668 वर पोहचली आहे.
यात अनुक्रमे वसई - 59 ,नायगाव-7 ,वसई- विरार- 4, नालासोपारा -141 आणि विरार - 66 असे एकुण 277 मुक्त रुग्ण आहेत.
आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण
जून पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मनपा व मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल रूग्ण व त्यांच्या नोंदी पालिकेत झाल्या नव्हत्या, त्यानंतर चौकशी व सर्वेक्षण करून फेरतपासणी करण्यात आली असता शनिवार दि,4 जुलै च्या आकडेवारी मध्ये एकूण 898 रूग्ण नोंदी पालिकेच्या आरोग्य विभागाने एकूण नोंदीत समाविष्ट केल्याचे स्पष्टीकरण स्वतः आयुक्त गंगाथरन डी यांनी लोकमत शी बोलताना दिले.