coronavirus : वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 96

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:57 PM2020-04-22T22:57:19+5:302020-04-22T23:05:26+5:30

आजवर वसई विरार शहरात 18 जण रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने आतापर्यंत 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

coronavirus: 5 new patients in Vasai-Virar; The total number was 96 | coronavirus : वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 96

coronavirus : वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 96

Next
ठळक मुद्देवसई -विरार शहरात बुधवारी 5 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झालीनालासोपारा पूर्वतील दोन नर्स कोरोना पॉझिटिव्हमुंबईतील नामांकित व मुंबई मनपा रुग्णालयातील त्या नर्स झाल्या बाधित

 वसई - वसई -विरार शहरात बुधवारी 5 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यात प्रामुख्याने नालासोपाऱ्याच्या दोन्ही महिला नर्सचा समावेश असून या दोघीहि मुंबईतील नामांकित व मुंबई मनपाच्या रुग्णालयात महिला नर्स म्हणून कार्यरत असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या वतीनं लोकमत ला देण्यात आली.

मंगळवार पर्यँत वसई- विरार शहरात कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या 91 झाली होती तर विरार मधील 42 वर्षीय रूग्णाचा मृत्य देखील मंगळवारीच मुंबईत उपचारादरम्यान झाला होता.

मात्र बुधवारी हीच संख्या 96 वर पोहचली असून यामध्ये आजवर वसई विरार शहरात 18 जण रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने आतापर्यंत 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,नालासोपारा पूर्वेला कोरोना बाधीत 48 वर्षीय व 46 वर्षीय या दोघी महिला मुंबईत मनपा व एका नामांकित खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या,त्या दोघीही पॉझिटिव्ह आढळून आल्या असून सोबत नालासोपारा पश्चिमेस एक 33 वर्षीय महिला देखील पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

तसेच नालासोपारा मध्ये 51 वर्षीय पुरुष रुग्ण हा मुंबईत भाजीपाला विक्री करायचा मात्र तो ही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर नालासोपारा पश्चिमेतील एक 20 वर्षाच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली असून त्याच्या कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने पालिकेच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.
दरम्यान दोनच दिवसापूर्वी नालासोपाऱ्यात एका २२ वर्षीय मुलाला देखील सारी रोगाची लागण होऊन तो बाधित झाला होता आता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नालासोपाऱ्यात कमी वयाच्या मुलांना लागण होण्याचे प्रकारामध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि वाढ चिंतेत टाकणारी आहे.एकूणच बुधवारी वसई तालुक्यात नव्याने आढळून आलेले सर्व रुग्ण नालासोपारा मधले असून या पाच हि रुग्णावर वसई- विरार व मुंबईत इतरत्र उपचार सुरू आहेत.

बुधवारी पालिकेने दिलेली आकडेवारी जरी 96 अंकावर पोचली असली तरी वसई तालुक्याची वाटचाल लवकरच शंभरी पार करेल यात अजिबात शंका राहिलेली नाही .

दि.22 एप्रिल 2020  बुधवारची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
नालासोपारा -3  महिला आणि 1  पुरुष आणि 1 मुलगा एकूण रुग्ण -5
वसई विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -96
कोरोना मुक्त संख्या :- 18
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 6
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-72

Web Title: coronavirus: 5 new patients in Vasai-Virar; The total number was 96

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.