Coronavirus : विरारमधील ५७ वर्षीय पोलिसाला कोरोना, कुटुंबियांना केले क्वारंटाईन  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:43 PM2020-04-10T19:43:05+5:302020-04-10T19:47:13+5:30

Coronavirus : विरारमधील एका पोलिसाचा तर वसईतील मृत पत्नीचा समावेश आहे.

Coronavirus: 57 year old policeman is corona positive from Virar, made quarantine to family members pda | Coronavirus : विरारमधील ५७ वर्षीय पोलिसाला कोरोना, कुटुंबियांना केले क्वारंटाईन  

Coronavirus : विरारमधील ५७ वर्षीय पोलिसाला कोरोना, कुटुंबियांना केले क्वारंटाईन  

Next
ठळक मुद्देविरार पश्चिमकडे राहणारे ५७ वर्षीय पोलीस कर्मचारी हे मुंबई पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.त्यांची पत्नी (५५) मुलगा (२८) मुलगी (२६) तसेच सासू (७३) यांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

वसई - वसईत शुक्रवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने वसईतील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३१ वर गेली आहे. यात विरारमधील एका पोलिसाचा तर वसईतील मृत पत्नीचा समावेश आहे.


विरार पश्चिमकडे राहणारे ५७ वर्षीय पोलीस कर्मचारी हे मुंबई पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली. तसेच वसई पश्चिम येथील मरण पावलेल्या रुग्णाच्या ५२ वर्षीय पत्नीला देखील करोनाची लागण झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि या महिलेला वसई विरार पालिकेच्या विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन सेंटर) उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी (५५) मुलगा (२८) मुलगी (२६) तसेच सासू (७३) यांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Coronavirus: 57 year old policeman is corona positive from Virar, made quarantine to family members pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.