CoronaVirus News: महापौरांच्या बैठकीला आयुक्तांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:30 PM2020-06-19T23:30:23+5:302020-06-19T23:30:43+5:30

वाढत्या रुग्णसंख्येने चिंता; प्रशासनासोबत आढावा बैठक

CoronaVirus Absence of Commissioner at Mayor's meeting | CoronaVirus News: महापौरांच्या बैठकीला आयुक्तांची अनुपस्थिती

CoronaVirus News: महापौरांच्या बैठकीला आयुक्तांची अनुपस्थिती

Next

वसई : वसई-विरारमध्ये एकीकडे कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे मात्र आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षही तीव्र होताना दिसत आहे. पालिका हद्दीतील कोरोना सेंटर्समध्ये रुग्णांना सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या गंभीर तक्रारी काही रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक करीत आहेत. यासंदर्भात महापौरांनी आयोजित केलेल्या बैठकीला आयुक्त गंगाथरन डी. यांनी पाठ फिरवल्याने याची चर्चा आता वसई-विरारमध्ये होऊ लागली आहे.

कोरोना विषाणू व पावसाळी कामांसंदर्भात महापालिका प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक महापौर प्रवीण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वसईत संपन्न झाली. या आढावा बैठकीत प्रामुख्याने कोविडबाधित व विलगीकरण केंद्रात रुग्णांना येणाऱ्या विविध समस्या तसेच रुग्णांची चाचणी, त्यांच्यावरील वैद्यकीय उपचार यावर सर्वंकष चर्चा करण्यात आली. या आढावा बैढकीत महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, आरोग्य सभापती राजेंद्र कांबळी, महिला व बालकल्याण सभापती माया चौधरी, मनपा प्रशासनाच्या वतीने अति. आयुक्त रमेश मनाले, अति. आयुक्त संजय देहरकर, उपायुक्त डॉ. किशोर गवस, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. तबस्सूम काझी तसेच प्रभाग समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, महापालिका अधिकारी वर्ग सुरक्षित अंतर व मास्क लावून हजर होते.
कोविड केअर सेंन्टरमधील रुग्णांच्या येणाºया तक्रारी तसेच रुग्णांस सेंटरपर्यंत नेण्याकरिता उपलब्ध होत नसलेली रुग्णवाहिका, मयत रुग्णांस नेण्यासाठी शववाहिनी, सेन्टरमध्ये डॉक्टरांकडून रुग्णांची नियमित तपासणी न होणे, वेळेवर नाश्ता, वेळेवर अन्नपुरवठा न होणे, अशा नानाविध तक्रारी वारंवार लोकप्रतिनिधी यांच्याकडे येत आहेत. या सर्व तक्रारी लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरुपात या अगोदरच महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत, परंतु त्या तक्रारींवर कालपर्यंत योग्य कार्यवाही न झाल्याने महापौर प्रवीण शेट्टी यांनी तातडीने आढावा बैठकीचे आयोजन वसई प्रभाग कार्यालय येथे केले होते.

रुग्णांच्या तक्रारी : प्रशासनाचे दुर्लक्ष
वसईतील जी जी कॉलेज आयसोलेशन सेंटरमध्ये गरोदर महिला, मधुमेह, दमा तसेच इतर आजाराने ग्रस्त असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात आले आहे. तेथील रुग्णांची आपल्या डॉक्टरांमार्फत तपासणी होत नाही, यांची तक्रार परिहवन सभापती प्रितेश पाटील यांनी महापौर यांना केली. ही बाब रुग्ण व लोकप्रतिनिधी वारंवार प्रशासनास सांगत असूनदेखील प्रशासन लक्ष देत नाहीत, असा आरोप बैठकीत करण्यात आला.

Web Title: CoronaVirus Absence of Commissioner at Mayor's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.