coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीतील जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:08 PM2020-08-18T17:08:46+5:302020-08-18T17:09:38+5:30

सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी.यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

coronavirus: All shops except gym and swimming pool in Vasai Virar municipal area start from today | coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीतील जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीतील जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

Next

-आशिष राणे
वसई -  वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र तथा शहरांतील जिम आणि स्विमिंग पूल वगळता आज (दि.18.) पासून सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली करण्यात आली आहेत. अनलॉक 2 व 3 मध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने आयुक्तांच्या निर्देशानुसार अजुनपर्यंत सुरू होती. त्यातच राज्य सरकार च्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने त्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी.यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.


राज्य सरकारने दुकाने सुरू करताना यापूर्वी दुकानासाठी पी-1 व पी-2 असा सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे शहरात महिनाभरात साधरण 12 दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी सर्वपक्षीय राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यावर निर्णय घेत मुंबई सहीत एम एम आर रिजन मधील आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर सर्व दुकाने खुली ठेवता येतील का याचा सारासार विचार व आरोग्य सर्वेक्षण करून निर्णय घ्यावयाचा आहे असे अधिकार प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी यापूर्वीची सम विषम पद्धत दि.17 ऑगस्ट च्या आदेशानुसार बंद केली. दरम्यान नव्या आदेशानुसार आता वसई विरार मधील प्रतिबंध क्षेत्र तथा जिम व स्विमिंग पूल वगळता शहरातील सर्व दुकाने सुरू होत असल्याने आता छोट्या मोठ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

तर विशेष म्हणजे मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्यविक्री ची दुकाने ही आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडी राहणार असुन गर्दी न होता तोंडाला मास्क,दोन व्यक्ती मध्ये सुरक्षित अंतर अर्थात (सोशल डिस्टन्सिंग) चे सर्व नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. अर्थातच शहरातील सर्व दुकानदारांनी कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा देखिल महापालिकेनं दिला असून आता एन गणेशोत्सव चार दिवसांवर असताना असे आदेश निघाल्याने वसईकरांना कोरोना संकटात हा एक दिलासा जणू मिळाला आहे.

व्यवसायिक व नागरिकांना दिलासा  
वसई-विरार मधील रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे तसेच रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही कमी होत असल्यानेच पालिका आयुक्तांनी धंदे उद्योग व रोजगार वाढीसाठी हा निर्णय घेतला असला तरी शहरांतील विविध प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हालचालींवर पालिकेच्या पथकाचे लक्ष व निर्बंध मात्र राहणार आहेतच .

विविध आरोग्य विषयक उपाययोजनेमुळेच रूग्ण संख्या आटोक्यात ; दिवसागणिक रूग्ण दर 14 % टक्यावर 
शहरातील बाधित रूग्ण संख्या, मृत्यू व मुक्त संख्या कमी होणे कामी विविध उपाययोजना मनपाने राबविल्या आहेत. यामध्ये जास्त रुग्ण संख्या असलेले क्षेत्र मोठे करून त्या भागात लॉकडाऊन करणे,गर्दी होणाऱ्या त्या दुकानांवर व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करणे,दंड आकारणी, शहरात चाचण्यांची संख्या वाढवणे, त्यामुळे आज वसई-विरारमध्ये रुग्ण संख्या कमी होत आहे आणि हा आकडा आता दिवसागणिक 14 टक्‍क्‍यांवर आलेला आहे ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.

डी मार्ट मात्र 24 तास खुले ?तर... डी मार्ट कुठल्या नियमात बसते ? सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न ?
वसई विरार पालिका आयुक्तांनी शहरांतील पी -1 पी -2 या सम विषम पद्धतीने या अगोदर काढलेल्या आदेशात देखील दुकानं सुरू होती मात्र तेव्हा ही वसईतील भाबोळे रस्त्यावर असलेलं डी मार्ट हे भले मोठे शॉपिंग मॉल 24 तास खुले होते व आज ही आहे, तर मग डी मार्ट हे शासनाच्या कुठल्या नियमानुसार 24 तास खुले आहे यासाठी डी मार्ट चे मॅनेजर सुर्वे यांना विचारले असता त्यांनी प्रश्न ऐकून झाल्यावर उत्तर देणे लोकमत शी टाळले.
तर मग आयुक्तांनी काढलेल्या या सर्व दुकानं 9 ते संध्याकाळी 7 पर्यँत च्या आदेशात डी मार्ट सुद्धा येणार का या प्रश्नांसाठी पालिका आयुक्तांना संपर्क केला असता तो झाला नाही.
 

"शासनाच्या नियमानुसार त्या त्या हद्दीतील प्रशासन असो की आयुक्त हे आदेश काढतात मात्र डी मार्ट हे पालिका हद्दीत येते आपण आयुक्तांना विचारणा करावी तरीही महसूल व गृह प्रशासन म्हणून मी पहाते व चौकशी करते "
- उज्वला भगत बनसोड
वसई तहसीलदार


"आयुक्तांनी सम विषम आदेश बंद करून सरसकट दुकानं सुरू केल्याचे समजले, मात्र वसईत भाबोळे येथील डी मार्ट हे आज नाही तर याअगोदर पासूनच दिवसरात्र खुले आहे. डी मार्ट हे अत्यावश्यक सेवा म्हणून जीवनावश्यक वस्तू पुरवणं या सेवेत असल्याने ते आज सेवा देत आहे तरी ही बाब महसूल विभागची आहे तर चौकशी करतो"
- विजयकांत सागर
अप्पर पोलीस अधीक्षक
वसई विभाग

Web Title: coronavirus: All shops except gym and swimming pool in Vasai Virar municipal area start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.