Coronavirus : कोरोनामुळे तारापूरच्या उद्योगांचे कंबरडे मोडणार, उद्योग ठप्प होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:53 AM2020-03-21T00:53:25+5:302020-03-21T00:54:10+5:30

आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

Coronavirus : Corona will break the backbone of Tarapur Industries | Coronavirus : कोरोनामुळे तारापूरच्या उद्योगांचे कंबरडे मोडणार, उद्योग ठप्प होण्याची शक्यता

Coronavirus : कोरोनामुळे तारापूरच्या उद्योगांचे कंबरडे मोडणार, उद्योग ठप्प होण्याची शक्यता

Next

- पंकज राऊत
बोईसर : पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध प्रकारच्या कारवाईच्या टांगती तलवारीबरोबरच आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट लांबल्यास हजारो कोटींच्या नुकसानीबरोबरच कंत्राटी कामगारांची अवस्था दयनीय होऊन एकूणच त्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन आर्थिक स्थिती कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई व इतर अनेक कारणे व समस्यांमुळे अनिश्चितता व अस्थिरतेत असतानाच कोरोना हा विषाणू देशात येऊन धडकल्याने आता चहूबाजूने आलेल्या संकटाला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत येथील उद्योजक असून उद्योगांची चाके अधिक रुतून विकासाची गती मंद होण्याची शक्यता आहे. देशावर येऊ घातलेल्या संभाव्य संकटाला समर्थपणे तोंड देऊन ते परतवण्याचे तारापूरच्या उद्योजकांच्या संघटनेने (टीमा) उद्योजकांना आवाहन केले आहे.
तारापूर येथे रासायनिक, औषधे, स्टील टेक्स्टाईल असे लहान, मध्यम व मोठे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग असून त्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, अधिकारी आणि उद्योगांची जोडधंदा व्यवसायाशी संबंधित असे डायरेक्ट व इनडायरेक्ट मिळून अडीच ते तीन लाखापर्यंत लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
उत्पादन करणाºया कारखान्यात ‘वर्कफ्रॉम होम’ शक्य नाही तसेच मुळातच कमीत कमी अथवा आवश्यक तितकेच कामगार, सुपरवायझर व इतर स्टाफचा वापर करून सध्या सर्वत्र काम केले जात असतानाच निम्म्या कामगारांच्या उपस्थितीत उत्पादन घेणे अशक्य तर आहेच, त्यातच धोकादायक रासायनिक कारखान्यात मुळातच कमी असलेली कामगार कपात करून उत्पादन घेणे हे सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळायची असेल तर धोका पत्करून उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा ते तात्पुरते बंद ठेवणे हा एकमेव पर्याय असून त्यामुळे उद्योगांबरोबरच कामगारांनाही आर्थिक संकटाशी सामना करावा लागणार आहे, परंतु राष्ट्रीय हित व सर्वांच्या आरोग्याला असलेला धोका पाहता सर्व संकटाला समर्थपणे तोंड देणे गरजेचे आहे.
तारापूर एमआयडीसीमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे ठाणे, मुंबई, वसई, विरार, पालघर, डहाणूपासून ते वापी येथून येत असतात.

कोरोनामुळे जगभरातील उद्योगाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. खरे तर इतर देशातील जनता भारतात घेतल्या जाणाºया दक्षतेचे कौतुक करीत आहे. आपणही शासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. मोठे संकट टाळण्यासाठी उद्योगांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.
- डी.के.राऊत, अध्यक्ष,
तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

Web Title: Coronavirus : Corona will break the backbone of Tarapur Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.