Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढताना भेडसावतो आहे किराणा मालाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:41 AM2020-05-09T02:41:20+5:302020-05-09T02:41:30+5:30

धुंदलवाडीच्या कातकरीपाड्यावरील नागरिकांची फरफट

Coronavirus: Coronavirus is facing a shortage of groceries | Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढताना भेडसावतो आहे किराणा मालाचा तुटवडा

Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढताना भेडसावतो आहे किराणा मालाचा तुटवडा

Next

बोर्डी : धुंदलवाडी गावच्या मुंबईपाड्यासह अन्य कातकरी पाड्यावरील आदिवासींकडे संसारोपयोगी किराणा साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही वेळच्या जेवणात केवळ भातावरच पोट भरण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान, शासनाने रेशन दुकानांवर अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी या गरजू लोकांकडून होत आहे.

दीड वर्षांपासून धुंदलवाडी हे गाव वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांसाठी ओळखले जात असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतात. या गावच्या कातकरी पाड्यावरील बहुतेक आदिवासींकडे स्वत:च्या मालकीची शेतजमिनी नसून स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांना परगावातील बांधकाम आणि विटभट्टी व्यवसायासाठी स्थलांतरित व्हावे लागते. लॉकडाउन लागू झाल्याने त्यांना गावात परतावे लागले आहे. दीड महिन्यांपासून हाताला काम नसल्याने रोजंदारीवर उदरनिर्वाह चालविणाºया या कुटुंबियांच्या गाठीला पैसा नाही. शासनाने रेशन दुकानांद्वारे त्यांना तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे.

सकाळी उठल्यापासून दोन कप चहासाठी चहा पावडर नसते. तर दुपार आणि रात्रीच्या जेवणात डाळ, तेल, मीठ, मसाला, हळद यांची वानवा असल्याने असे पदार्थ खायला कुटुंबातील सदस्य धजावत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ताटात कोणता पदार्थ वाढावा या समस्येने महिलांचे डोके चक्रावले आहे. एकीकडे कोरोनाशी लढताना शहरातील नागरिक दर तासाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करून या आजारापासून स्वत:चा बचाव करीत आहेत. तर दुसरीकडे येथील ग्रामस्थांना आंघोळीचा आणि कपड्यांचा साबण घ्यायला हाती पैसा नसल्याने शारीरिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लॉकडाउन काळात अन्य राज्यातील मजूर, नागरिक, प्रवासी यांच्यासाठी निवारा केंद्र उभारून तेथे त्यांच्या राहण्यासह नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था केली गेली. तर शहरी वस्तीनजीक राहणाºया नागरिकांना विविध संस्थांनी खाण्या-पिण्याच्या वस्तूंप्रमाणेच महिना-दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य उपलब्ध करून दिले. मात्र या गावातील कातकरी पाड्यावर अद्याप कुणीच फिरकलेले नाही.

केवळ शासनाने स्वस्त धान्य दुकानातून दिलेल्या तांदळवर संपूर्ण कुटुंबाची भिस्त अवलंबून आहे. परंतु हे किती दिवस चालेल, असा प्रश्न येथील कातकरीपाड्यावर राहणाºया दिनेश भसरा याने केला आहे. भूकंपाच्या भयाखाली वावरणाºया ग्रामस्थांना कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी कुचंबणा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाने रेशन दुकानांद्वारे येथील ग्रामस्थांसाठी तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे दात्यांकडून मदतीचा हात का मिळू नये, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

Web Title: Coronavirus: Coronavirus is facing a shortage of groceries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.