Coronavirus: पालघर हत्याकांडातील आरोपीला कोरोनाची लागण; वाडा पोलीस स्टेशनवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:16 AM2020-05-03T02:16:13+5:302020-05-03T02:16:46+5:30

अन्य आरोपींसह पोलिसांचेही अलगीकरण

Coronavirus: Coronavirus infected in Palghar sadhu murder case; Crisis at Wada police station | Coronavirus: पालघर हत्याकांडातील आरोपीला कोरोनाची लागण; वाडा पोलीस स्टेशनवर संकट

Coronavirus: पालघर हत्याकांडातील आरोपीला कोरोनाची लागण; वाडा पोलीस स्टेशनवर संकट

Next

पालघर/वाडा : गडचिंचले येथे झालेल्या तिघांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटकेतील ५५ वर्षीय आरोपीला कोरोनाची लागण झाली असून हा आरोपी हा वाडा पोलीस कोठडीत असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य आरोपींसह पोलिसांचे अलगीकरण करण्यात येणार आहे. या आरोपीला मुंबई येथे हलविण्याबाबत पोलीस अधीक्षकांना कळविण्यात आल्याची माहिती पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित यांनी दिली.

डहाणू येथील गडचिंचले गावात घडलेल्या तिघांच्या हत्येने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील ११५ आरोपींपैकी २२ आरोपींना वाडा येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २६ एप्रिल रोजी या सर्व आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, मात्र याबाबत १ तारखेला आलेल्या अहवालात डहाणू तालुक्यातील दिवशी-वाकीपाडा येथील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

लागण झालेल्या या आरोपीला उपचारासाठी तात्काळ पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कैदेतील आरोपींना ठेवण्याची व्यवस्था पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नसल्याने त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात यावे, यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांना कळविण्यात आले आहे. जे.जे. रुग्णालयातील आरोपी कक्षात या आरोपीची रवानगी करण्यात येणार असून पोलिसांनी कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर त्याला मुंबईत नेण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपीच्या संपर्कात आलेल्या अन्य २३ आरोपींसह पोलीस व अन्य व्यक्तींचा वाडा पोलीस निरीक्षण अहवाल तयार करीत आहेत. न्यायालयाच्या आदेशाने अन्य २३ आरोपींचे अलगीकरण करण्यात येणार असून या आरोपींची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता वाडा शहर ७ मे पर्यंत पूर्ण बंद करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.


डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाºया या आरोपीला

कोरोनाची लागण कशी झाली, याबाबत अनेक तर्क बांधले जात आहेत. वाडा पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालय आता अन्य जागेतून आपला कारभार चालविणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाची लागण झाली कशी?
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाºया या आरोपीला कोरोनाची लागण कशी झाली, याबाबत अनेक तर्क बांधले जात आहेत. वाडा पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय आता अन्य जागेतून आपला कारभार चालविणार आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता ७ मे पर्यंत वाडा शहर बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Coronavirus: Coronavirus infected in Palghar sadhu murder case; Crisis at Wada police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.