Coronavirus: कोरोनामुळे विक्रमगडमधील मोगरा कोमेजला; फुल बाजारपेठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 06:09 AM2020-05-07T06:09:46+5:302020-05-07T06:09:53+5:30

यावर्षी हंगाम फुकट गेल्याने शेतकरी संकटात

Coronavirus: Coronavirus kills Mogra in Vikramgad; Flower markets closed | Coronavirus: कोरोनामुळे विक्रमगडमधील मोगरा कोमेजला; फुल बाजारपेठा बंद

Coronavirus: कोरोनामुळे विक्रमगडमधील मोगरा कोमेजला; फुल बाजारपेठा बंद

googlenewsNext

राहुल वाडेकर
 

विक्रमगड : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन मोसमात हा फटका बसल्याने शेतकºयाचे पार कंबरडे मोडले आहे. त्यात फुलशेती तर पूर्णपणे संपुष्टात आली असून विक्रमगड तालुक्यातील मोगरा उत्पादित करणाºया आदिवासी शेतकऱ्यांचे पार नुकसान झाले आहे.

खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी,उपराले, देहर्जा अशा अनेक गावांत मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात शेतकºयानी केली आहे. यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित व बेरोजगारीने पिसलेल्या येथील लोकांना उत्तम पर्याय निर्माण झाला. सोबत विक्रमगड-जव्हार तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या उंबरवांगण, साखरे, पोचाडा, वाकी, कावळा या ठिकाणी शेकडो आदिवासी शेतकºयांनी मोगरा लावला आहे.

मोगºयाचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते. ज्यात प्रतिकिलो ३०० ते ५०० इतका दर मिळत असतो. दादर व नाशिक या ठिकाणी मोगºयाला मागणी असून मोगºयामुळे आदिवासी लोकांच्या जीवनात सुगंध दरवळला होता. मोगरा दारात लावल्याने स्थलांतर थांबले असून वषार्नुवर्षे सुरू असलेल्या भटकंतीला पूर्णविराम लागला होता. यामुळे आदिवासी माणूस स्थिरावला होता.
या मोगºयामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाब आणि सोनचाफ्याची देखील लागवड करण्यात आली आहे. त्यापासून देखील चांगले उत्पन्न हे शेतकरी घेत होते. त्यामुळे स्थलांतरित होणारी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्थिरावली होती. मात्र होळीपासून कोरोना व्हायरसचा फैलाव भारतात सुरू झाल्याने शेतीवर गदा आली.

लॉकडाऊनमुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई देखील अडकल्याने फुलशेतीवर कुºहाड कोसळली. मोगरा उत्पादक रातोरात बेरोजगार झाला असून ऐन मोसमात मोगºयाची मागणी ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. लॉकडाऊन उठेपर्यंत पावसाळा येईल. त्यांनतर मोगरा उत्पादन बंद होईल. त्यामुळे यंदाचा हंगाम बरबाद झाला असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

तालुक्यात फुलशेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणारे शेतकरी आहेत. विविध गावांत मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू, कागडा फुलांचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यातून ही फुले दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर बाजारपेठेत जातात. होळीपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे तालुक्यातील फुलउत्पादक शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. - शिवम मेहता, मोगरा उत्पादक

Web Title: Coronavirus: Coronavirus kills Mogra in Vikramgad; Flower markets closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी