coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 01:34 AM2020-05-14T01:34:30+5:302020-05-14T01:34:54+5:30

मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे.

coronavirus: Coronavirus in Lagnasarai, mandap commercial financial crisis | coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात

coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात

Next

जव्हार : मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या सीझनवर वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकणारे मंडप व्यावसायिक यंदा मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे जव्हारच्या मंडप डेकोरेटर व्यावसायिकांनी एकत्र येऊन शासनाकडून मदत मिळावी यासाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. यंदा झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने मंडप व्यापाऱ्यांनाही मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मिळाली.
मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे. हे व्यापारी वर्षभर या सीझनची आतुरतेने वाट बघत असतात. वर्षभराचा गाडा हाकण्यासाठी वर्षातील हे तीन - चार महिने त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. यावर्षी सगळेच गणित चुकले. एरवी लग्नसराईत फुरसत नसणाºया मंडप व्यापाºयांना यंदा मोठा फटका याना बसला आहे.
जव्हारमध्ये नऊ ते दहा छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांना यावर्षी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपयांच्या आॅर्डर होत्या. मात्र सामूहिक कार्यक्रमावर बंदी असल्याने आणि हा काळ लवकर संपणार नसल्याचे चिन्ह असल्याने शासनाने मंडप व्यापाºयांचा विचार करावा आम्हालाही मानधन मिळावे.

जव्हारमध्ये नऊ ते दहा छोटेमोठे व्यापारी आहेत. त्यांना यंदा प्रत्येकी दोन ते तीन लाखांच्या आॅर्डर होत्या. मात्र, सामूहिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने आणि हा काळ लवकर संपण्याची चिन्हे नसल्याने शासनाने आमचा विचार करावा, जेणेकरून आम्ही कुटुंबाची काळजी घेऊ शकू, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमचे व्यवसाय बारमाही नाहीत. पावसाळ्याचे चार महिने तर नुसते घरी बसून काढावे लागतात. शासनाने जशी इतर व्यावसायिकांना, मजुरांना आर्थिक मदत केली आहे, तशीच आम्हा मंडप व्यापाºयांनाही करावी.
- प्रदीप राऊत, मंडप व्यापारी

Web Title: coronavirus: Coronavirus in Lagnasarai, mandap commercial financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.