Coronavirus : लाॅकडाऊनमुळे रब्बी पीक धोक्यात; शेतकरी आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:53 PM2020-04-24T15:53:00+5:302020-04-24T16:35:13+5:30

Coronavirus : भाजी पाला, फुलशेती पिकविणारे शेतकरी देशोधडीला लागले पण रब्बी हंगामात पिकवलेले कडधान्येही पडून राहिले असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

coronavirus crisis hits farmers and food supplies SSS | Coronavirus : लाॅकडाऊनमुळे रब्बी पीक धोक्यात; शेतकरी आर्थिक संकटात

Coronavirus : लाॅकडाऊनमुळे रब्बी पीक धोक्यात; शेतकरी आर्थिक संकटात

Next

वाडा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेली कडधान्याची पिके धोक्यात आली आहेत. ही पिके आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांना योग्य दर देऊन खरेदी करावीत अशी मागणी वाड्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.

वाडा तालुक्यात बाराशे हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकामध्ये तूर, हरभरा, वाल, मूग, उडिद, चवळी, धने, मटकी, राई, तीळ, ही पिके घेतली जातात. विशेषत: या वर्षी सुध्दा येथील शेतकऱ्यांनी वाल, हरभरा, तूर, मुगाचे चांगले उत्पादन घेतले आहे. मात्र सध्या जगभरात कोरोनाचे संकट ओढावल्याने सर्वत्र ताळेबंदी सुरू आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. त्याचा परिणाम इतर व्यवसायिकांप्रमाणे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून तालुका कुषी विभागातील मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे कार्यालयात बसून माल वाहतूक पास देण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यापलीकडे काहीच करत नाहीत. शेतकऱ्यांच्या वाया चाललेल्या पिकांचे त्यांना काहीच सोयर सुतक नाही. फक्त अत्यावश्यक सेवेचे गाड्यांना पासेस लावून तालुक्यात शोशायनिंग करीत फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

भाजी पाला, फुलशेती पिकविणारे शेतकरी देशोधडीला लागले पण रब्बी हंगामात पिकवलेले कडधान्येही पडून राहिले असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ही कडधान्ये शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करून शेतकऱ्यांना  दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

रब्बी हंगामात पिकवलेले तूर,मूग, वाल,हरभरा, यांसारखी पिके हमी भावाने खरेदी करण्याची शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. लाॅकडाऊनमुळे खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. त्यामुळे कडधान्ये शेतकऱ्यांच्या घरीच सडणार असून शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे.

- भाई पाटील, वाल उत्पादक शेतकरी, चिंचघर पाडा

कडधान्यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून करावी या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू असून या विषयी कृषी मंत्र्यांचीही सहकार्याची भूमिका आहे.

- ज्योती  ठाकरे, अध्यक्षा महिला आथिॅक विकास महामंडळ

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा धसका! स्मशानाबाहेर पडून होता मृतदेह पण कोणीच आलं नाही, अखेर...

Coronavirus : ...म्हणून आमदाराने धरले डॉक्टरचे पाय, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर

Coronavirus : आनंदाची बातमी! आणखी एक राज्य कोरोनामुक्त, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू

 

Web Title: coronavirus crisis hits farmers and food supplies SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.