coronavirus: एका आरोपीमुळे आठ पोलीस क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 11:50 PM2020-07-04T23:50:12+5:302020-07-04T23:50:50+5:30

जमिनीच्या पैशांचा गैरव्यवहार करून पैसे लाटणा-या आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ पोलिसांना क्वारंटाईन केले.

coronavirus: Eight police quarantine due to one accused | coronavirus: एका आरोपीमुळे आठ पोलीस क्वारंटाईन

coronavirus: एका आरोपीमुळे आठ पोलीस क्वारंटाईन

Next

मनोर : पालघर पूर्वेत मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिलायन्स पाईप लाइनबाधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पैशांचा गैरव्यवहार करून पैसे लाटणा-या आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ पोलिसांना क्वारंटाईन केले. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या संपर्कात आणखी किती लोक आले, ते पाहावे लागेल.

जामीन अर्ज नामंजूर : अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित पाच आरोपींची कोठडी २ जुलै रोजी संपली. त्यामुळे आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: coronavirus: Eight police quarantine due to one accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.