coronavirus: कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती सोय करावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:11 AM2020-05-15T03:11:56+5:302020-05-15T03:12:19+5:30
अनेक कर्मचारी मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये कामानिमित्त गेले आहेत आणि त्यामुळे पालघरमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवेमध्ये रुजू असलेल्या पालघरच्या कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून यावर उद्या सुनावणी आहे.
अनेक कर्मचारी मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये कामानिमित्त गेले आहेत आणि त्यामुळे पालघरमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. राज्य सरकारने या कर्मचाºयांची मुंबईत तात्पुरती राहण्याची सोय करावी किंवा या कर्मचाºयांना कामावर उपस्थित राहण्यास सांगू नये. कारण, यामुळे वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत राहणाºया नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. मुंबईत काम करणाºया ४७ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भट यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. भट यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले की, १ मे रोजी पालघर येथे कोरोनाचे १३६ रुग्ण आढळले. त्यातील १० रुग्णांचा मृत्यू झाला. वेळीच खबरदारी नाही घेतली तर आपल्याही जीवाला धोका आहे, अशी भीती स्थानिकांमध्ये आहे.