CoronaVirus : वडिलांचा मृतदेह नेला दुचाकीवर, पालघरमधील दुर्दैवी घटना, लॉकडाउनमुळे ओढवली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:06 AM2020-03-28T02:06:07+5:302020-03-28T05:41:00+5:30

CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचाच फटका वावरे कुटुंबीयांना शुक्रवारी बसला.

CoronaVirus: Father's body taken away on bike, unfortunate incident in Palghar, lockdown situation | CoronaVirus : वडिलांचा मृतदेह नेला दुचाकीवर, पालघरमधील दुर्दैवी घटना, लॉकडाउनमुळे ओढवली परिस्थिती

CoronaVirus : वडिलांचा मृतदेह नेला दुचाकीवर, पालघरमधील दुर्दैवी घटना, लॉकडाउनमुळे ओढवली परिस्थिती

googlenewsNext

कासा : सर्पदंश झालेल्या वडिलांना कासा उपजिल्हा रुग्णालयात आणताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाउनमुळे त्यांचा मृतदेह मुलांना मोटरसायकलवर न्यावा लागल्याची दुर्दैवी घटना डहाणू तालुक्यात घडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचाच फटका वावरे कुटुंबीयांना शुक्रवारी बसला. कासा भागातील चिंचारे येथील लडका देवजी वावरे (६०) यांना शुक्रवारी सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची मुले त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात नेत होती.
त्यांची तब्येत गंभीर झाल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आणि आपल्या वडिलांचा मृतदेह मोटरसायकलवरून घरी नेण्याची वेळ या मुलांवर आली. लडका यांना २४ मार्च रोजी, मंगळवारी सकाळी सर्पदंश झाला होता. उपचारांसाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचे सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसºया दिवशी, २५ मार्चला बुधवारी डिस्चार्ज दिला.
मात्र घरी असतानाच शुक्रवारी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. तेव्हाच त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांची तब्येत गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकलवरूनच माघारी घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.
रूग्णाचा हार्टअ‍ॅटॅकने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप धोडी यांनी व्यक्त केला.

- या रुग्णावर उपचार करून त्यांना घरी सोडले होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे कदाचित हार्टअ‍ॅटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप धोडी यांनी व्यक्त केला.

Web Title: CoronaVirus: Father's body taken away on bike, unfortunate incident in Palghar, lockdown situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.