CoronaVirus News: कोरोनामुळे घडी विस्कटली; आर्थिक संकटाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:42 PM2020-06-19T23:42:16+5:302020-06-19T23:43:30+5:30

अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.

CoronaVirus financial crisis due to corona | CoronaVirus News: कोरोनामुळे घडी विस्कटली; आर्थिक संकटाची टांगती तलवार

CoronaVirus News: कोरोनामुळे घडी विस्कटली; आर्थिक संकटाची टांगती तलवार

Next

- पंकज राऊत

बोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे गेल्या अडीच-तीन महिन्यांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा गंभीर परिणाम छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच उद्योगजगत, नोकरदार तसेच हातावर पोट भरणाऱ्यांवर होऊन या सर्वांचेच अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.

कोरोनाची साखळी तुटून त्याचा प्रसार व प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच देशातील करोडो नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवून हाहाकार माजू नये म्हणून लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नव्हता. हे वास्तव असले तरी त्याचा गंभीर परिणाम ग्रामपंचायतीपासून राज्य व केंद्राच्या तिजोरीवरही झाला आहे. परंतु, खरी आर्थिक झळ ही गरिबातील गरीब व श्रीमंतांनाही बसून मध्यमवर्गाची स्थिती दयनीय झाली आहे. एका बाजूला कोरोना तर दुसºया बाजूला आर्थिक संकट यामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी सावरून पुन्हा कधी रुळांवर येईल, याबाबतही अनिश्चितता असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

कोरोनाच्या संकटामुळे फक्त दूध, किराणा, भाजीपाला, औषधांची दुकाने, गॅस वितरण, दवाखाने व रुग्णालये या अत्यावश्यक सेवा चालू राहिल्या. याव्यतिरिक्त सर्व उद्योगधंदे बंदच राहिले. जवळपास तीन महिने बंदीत गेल्यामुळे उद्योग नगरी व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने व प्रत्येक धंदा-व्यवसायातून, कामातून पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने कामगार, बिगारी, मोलकरणी, शेतकरी, शेतमजूर, मजूर, नोकरदार व हातावर पोट असणारे इत्यादी सर्वांना आज संघर्ष करावा लागत आहे. आज हजारोंच्या हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. कोरोनासारख्या घातक विषाणूला रोखण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे आज सर्व जण दुहेरी संकटात सापडले आहेत.

उद्योग व कामगारांसमोर मोठे संकट
सध्या उद्योगांना अनेक समस्या, अडचणी व संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने विशिष्ट ठिकाणी मॅनपॉवरचा तुटवडा जाणवतो, तर कच्च्या मालाचा पुरेसा व जलदपणे पुरवठा होत नसून आंतरराष्ट्रीय बाजारपेठही ठप्प झाल्याने उद्योगांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कापड उद्योग उभारी घेण्यासाठी अवधी लागेल तर बल्क ड्रग्ज व फार्मास्युटिकल्स उद्योगांना चांगली संधी असली, तरी उद्योगांसमोर असलेल्या विविध अडचणींमुळे या उद्योगावर अवलंबून असलेला कामगार व जोडधंदा व व्यवसाय करणारे मात्र मेटाकुटीला येऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

Web Title: CoronaVirus financial crisis due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.