Coronavirus : डहाणू ग्रामीण भागातील 4 वीटभट्टी कामगार कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 01:23 PM2020-04-18T13:23:32+5:302020-04-18T13:28:40+5:30
Coronavirus : डहाणू तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या आता 7 झाली आहे.
कासा - वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या 3 वर्षाच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील रानशेत भागातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या 4 जणांमध्ये विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांचा समावेश आहे. यामुळे डहाणू तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या आता 7 झाली आहे. गंजाड येथील 3 वर्षीय मुलीच्या संपर्कात आल्याने या चारही जणांचे स्वॅब सँपल कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. डहाणू तालुक्यातील संपर्कात आलेल्या एकूण 12 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले त्यापैकी 4 जणांचे पॉझिटिव्ह तर इतर 8 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा 12 जणांचे रिपोर्ट आले त्यापैकी4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चारही कोरोनाबाधितांना बोईसर येथील टिमा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढला असून रुग्णांची संख्या 13,000 वर गेली आहे.
Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वरhttps://t.co/lIDmpaKiV4#CoronaInMaharashtra#CoronaUpdatesInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : लग्नासाठी तब्बल 850 किलोमीटर सायकलने पोहोचला नवरदेव पण...
Coronavirus : किसान योजनेसह श्रावणबाळच्या रकमेसाठी बँकांमध्ये गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू