CoronaVirus वसई- विरार वगळता एकट्या नालासोपाऱ्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:37 PM2020-05-06T19:37:11+5:302020-05-06T19:37:31+5:30
पालिका हद्दीत संख्या पोहचली 168 वर ; बुधवारी 10 कोरोना मुक्त
वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत बुधवारी दिवसभरात वसई- विरार वगळता एकट्या नालासोपारा पूर्व पश्चिम भागात 10 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून मंगळवारी वसई विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातुन एकही रुग्ण मुक्त झालेला नव्हता त्यामुळे थोडी निराशा होती ,परंतु बुधवारी मागील दोन दिवसात सर्वाधिक 10 रुग्ण मुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.
त्यामुळे आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 168 इतकी झाली असून यामध्ये 5 पुरुष व 5 महिलाचा समावेश आहे तर खास करून यात एक 10 वर्षाची मुलगी देखील आहे.हि मुलगी आधीच बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील आहे .त्यामुळे पुरुष व महिला मिळून एकूण 10 जणांचा समावेश या एकूण रुग्ण यादीत करण्यात आला आहे, तर हे सर्वजण नालासोपारा पूर्व- पश्चिम विभागातले रुग्ण आहेत .
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी आढळून आलेले हे सर्व पुरुष व महिला रुग्ण हे हायरिस्क संपर्कांतले रुग्ण असून यामध्ये फळ विक्रेता ,सुरक्षा रक्षक ,जेष्ठ नागरिक व एक लहान 10 वर्षाची मुलगी आदीं सर्वावर वसई विरार व मुंबईत विविध रुग्णालयात व आयसोलेशन केंद्रात उपचार सुरु आहेत
तर बुधवारी सर्वाधिक वसई विरार महापालिका हद्दीतीले 10 कोरोना रुग्ण हे रुग्णालयातून मुक्त करण्यात आल्याने पालिकेची सुटकेचा निश्वास सोडला आहे.
एकूणच या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 168 वर गेली आहे तर आजवर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत,तर बुधवारी पालिका हद्दीतील विविध भागात मागील दोन दिवसात एकूण 25 रुग्ण मुक्त झाल्याने आता या मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 90वर गेली आहे तर आजवर 70 रुग्णावर वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आजची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
नालासोपारा -5 पुरुष,आणि ५ महिला
एकूण रुग्ण संख्या -10
वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -168
कोरोना मुक्त संख्या :- 90
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 70