CoronaVirus News: पुन्हा 220 कोरोनाबाधितांची वाढ; नालासोपारात दोन रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:51 PM2020-06-30T22:51:45+5:302020-06-30T22:52:02+5:30

वाढती संख्या महाचिंतेची बाब

CoronaVirus News: 220 corona infections again; Two patients die in Nalasopara | CoronaVirus News: पुन्हा 220 कोरोनाबाधितांची वाढ; नालासोपारात दोन रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus News: पुन्हा 220 कोरोनाबाधितांची वाढ; नालासोपारात दोन रुग्णांचा मृत्यू

Next

- आशिष राणे

वसई : वसई -विरार शहरात मंगळवारी सर्वाधिक पुन्हा रेकोर्ड ब्रेक 220  कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले तर पालिका हद्दीतील नालासोपारा स्थित 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून  शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 4 हजार 137 वर पोहचली आहे, तर दिवसभरात 148 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे

दरम्यान मंगळवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 220 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये वसई-76 नायगाव -13 वसई-विरार- 1 नालासोपारा- 73  आणि विरार-57   यात  पुरुष 121 व 99 महिला रुग्ण अशा एकूण 220 रुग्णाचा अंतर्भाव आहे.

तर पालिका हद्दीत 2 रुग्णाचा मृत्यू 

पालिका हद्दीत मंगळवारी 2 रुग्णाचा मृत्यू झाल्यानं शहराची चिंता अधिक वाढतेच आहे. यात दोन्ही रूग्ण नालासोपारा मधील  आहेत, त्यामुळे आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 117  इतकी झाली आहे .शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित मयत व बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने महाचिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक ; वसई विरार शहरात 148  रूग्ण घरी परतले 

वसई विरार मनपा हद्दीत मंगळवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 148  रूग्ण आपापल्या घरी परतले. यात वसई- 45 वसई- विरार-7 नायगाव- 5   नालासोपारा-  68 आणि विरार - 23 असे एकूण 148 मुक्त रूग्ण आहेत, त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 1968 वर पोहचली आहे.

Web Title: CoronaVirus News: 220 corona infections again; Two patients die in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.