CoronaVirus News : वसईत बाधिताचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:48 AM2020-06-24T04:48:00+5:302020-06-24T04:48:21+5:30

CoronaVirus News : या प्रकरणी वसई पोलिसांनी शेकडो ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत.

CoronaVirus News : An ambulance carrying the body of the victim was stopped in Vasai | CoronaVirus News : वसईत बाधिताचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका रोखली

CoronaVirus News : वसईत बाधिताचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका रोखली

Next

वसई : कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून स्मशानात नेत असताना पापडी येथील काही ग्रामस्थांनी रुग्णवाहिका तासभराहून अधिक काळ अडवून धरल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी शेकडो ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वसई पश्चिम येथील उमेळे फाटा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. पालिकेने पत्र दिल्यानंतर सोमवारी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पालिका व वसई पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली,
सुरुवातीला वसई ‘ई’ विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त आणि त्यांच्या टीमने येथील गोळा झालेल्या ग्रामस्थांना समजावून सांगितले, मात्र त्याचा काहीही उपयोग न होता जमाव अधिक संतप्त झाला. अखेर पोलिसांची मदत घेत हा जमाव पांगवावा लागला. महापालिका प्रशासनाने घडल्या प्रकाराबाबत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र दिल्यावर पोलिसांनी या प्रकरणी १०० ते १२५ जणांवर गुन्हे दाखल केले.

Web Title: CoronaVirus News : An ambulance carrying the body of the victim was stopped in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.