CoronaVirus News: विरार, नालासोपारा कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:16 AM2021-04-09T00:16:44+5:302021-04-09T00:16:59+5:30

दिवसभरात ४६४ रुग्ण : उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार हजारहून जास्त

CoronaVirus News: Hotspot of Virar, Nalasopara Corona | CoronaVirus News: विरार, नालासोपारा कोरोनाचा हॉटस्पॉट

CoronaVirus News: विरार, नालासोपारा कोरोनाचा हॉटस्पॉट

googlenewsNext

- मंगेश कराळे

नालासोपारा : वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान माजवले असून आतापर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा चार हजाराच्यावर गेला आहे. विरार आणि नालासोपारा शहरात आढळणारी रुग्णसंख्या सर्वाधिक असून या शहरातील जनजीवन सध्या भीतीखाली आहे. तिन्ही शहरांत कोरोना विषाणूचा कहर माजला असून आता आढळणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.

विरारच्या झोपडपट्टी परिसर आणि नालासोपाऱ्याच्या मिनी धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एन्ट्री केल्याने समूह संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या व आरोग्य विभागात चिंतेत वाढ झाली आहे. आधीच कोरोनाग्रस्तांचा आकडा दुपटीने वाढत असून त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांनी या काळात अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

वसई-विरारमधील रुग्णालयांतील खाटादेखील फुल्ल झाल्या असल्याने रुग्णांची उपचाराविना परवड होत आहे. अशात समूह संसर्गाची चिंता महापालिका प्रशासनाला भेडसावत आहे. मागील दोन दिवसात विरारमध्ये ५३७ तर नालासोपारा शहरात ५३२ रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा धोका अजून वाढला आहे.

वसई-विरारमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची चार हजारांच्या वर गेल्याने महापालिकेची चिंतादेखील वाढली आहे. नागरिकांनी आपत्ती काळाचा धोका पाहता विनाकारण घराबाहेर अद्यापही पडू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण होत असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर आता ताण येऊ लागला आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनाची संख्या कमी झाल्यावर राज्य शासनाने नियम शिथिल केल्यानंतर मोठी गर्दी ठिकठिकाणी आली होती. साहजिकच त्याचा फटका कोरोना वाढीमध्ये 
बसत आहे.

सर्वाधिक रुग्ण विरार, नालासोपारा शहरांत
विरार आणि नालासोपाऱ्याच्या पूर्व पश्चिम परिसरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून विरार व नालासोपारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ४ हजार १९३ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील सात दिवसांत विरार शहरात सर्वाधिक १२५५ रुग्ण आहेत. नालासोपारा शहरात ११२६ रुग्ण, वसई शहरात ९६० रुग्ण तर नायगाव शहरात १२५ रुग्ण आढळले आहेत. सात दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मागील आठ दिवसांतील आकडेवारी
दिनांक     वसई     नालासोपारा     विरार     नायगाव
१ एप्रिल      १०८       ९२       ११४       ११
२ एप्रिल       १३२       १२४       ९४       ८
३ एप्रिल      ८३       ८३       १७५       ६
४ एप्रिल      १४६       १३५      १३८      १२
५ एप्रिल      १३९      १५०      १९७      ३१
६ एप्रिल      १९४      ३२८      २५१      ३४
७ एप्रिल     १५८       २०४       २८६       २३
एकूण     ९६०       ११२६       ११५५       १२५

Web Title: CoronaVirus News: Hotspot of Virar, Nalasopara Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.