CoronaVirus News: नालासोपारात सामाजिक अंतराचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:01 AM2021-04-10T01:01:10+5:302021-04-10T01:01:17+5:30

महानगरपालिकेची केवळ बघ्याची भूमिका : नागरिकांमध्ये बेफिकिरी कायम

CoronaVirus News: Thirteen of the social gap in Nalasopara | CoronaVirus News: नालासोपारात सामाजिक अंतराचे तीनतेरा

CoronaVirus News: नालासोपारात सामाजिक अंतराचे तीनतेरा

Next

नालासोपारा : मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वसई-विरारमध्ये एन्ट्री घेत जनजीवन हादरवून सोडले आहे. रोजच्या रोज वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम व्यवसाय आणि मानवी जीवनावर होत आहे. दुसरीकडे नालासोपारा-विरारमधील कोरोनाचा उद्रेक प्रचंड आहे, मात्र नागरिक कोरोनाला अजिबात गांभीर्याने वागत नसल्याने सामाजिक अंतराचे तीनतेरा उडत असून कोरोनाला आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे.

नालासोपारा पूर्व परिसरात तर सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते. येथे भरणाऱ्या बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकते.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती भयंकर झाली असून गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार ४ हजार ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडादेखील हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र तरीही बहुसंख्य नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने चिंता वाढली आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला मज्जाव करण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. हळूहळू कोरोनाबाबतीतील भय नागरिकांमधून कमी होत गेल्याने कोरोनाला गांभीर्याने घेतले जात नाही. नालासोपाऱ्यात तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यासारखेच नागरिक वागत आहेत. नालासोपाऱ्यातील सध्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. नालासोपारा-विरार ही दोन्ही शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली असताना नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.

Web Title: CoronaVirus News: Thirteen of the social gap in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.