CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमध्ये २५ नवे रुग्ण; कोरोनाबाधित ४३५ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:08 AM2020-05-23T02:08:37+5:302020-05-23T02:08:56+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वसईतील अवघ्या दीड वर्षे व साडेतीन वर्षे वयाच्या तर नालासोपारामधील दोन वर्षांच्या मुलाचा यात समावेश आहे. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत
वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी २५ नवे रुग्ण आढळून आले. तर ८ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३५ वर पोहोचली आहे.
शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वसईतील ५ पुरुष, नालासोपारातील ९ पुरुष आणि ३ महिला तर विरारमधील ५ पुरुष व ३ महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत.
वसईतील अवघ्या दीड वर्षे व साडेतीन वर्षे वयाच्या तर नालासोपारामधील दोन वर्षांच्या मुलाचा यात समावेश आहे. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
वसई-विरार हद्दीत बाधित रुग्णांची एकूण संख्या ४३५ वर पोहचली असून आजवर पालिका हद्दीत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्तांची संख्या २१९ झाली आहे. तर आजवर १९९ बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.