Coronavirus : पालघरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुन्हा उतरवले, आठवड्यातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:03 AM2020-03-21T01:03:44+5:302020-03-21T01:04:37+5:30

गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते.

Coronavirus: Passengers who Came from abroad news | Coronavirus : पालघरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुन्हा उतरवले, आठवड्यातील दुसरी घटना

Coronavirus : पालघरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुन्हा उतरवले, आठवड्यातील दुसरी घटना

Next

पालघर : थायलंडवरून मुंबईत आलेल्या व कच्छ एक्सप्रेस ट्रेनने आपल्या घरी वापी येथे जाणाऱ्या दोन नवदाम्पत्यासह अन्य एका सहकारी जोडप्याला गुरुवारी पालघर स्थानकात उतरविण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. थायलंडची टूर आटोपून हे चार लोक १८ मार्च रोजी मुंबई विमानतळावर उतरले. तेथून त्यांनी ठाणे येथील आपल्या नातेवाईकांकडे एक दिवसाचा मुक्काम आटोपून त्यांनी आॅनलाईन पद्धतीने बांद्रा टर्मिनसवरून सुटणाºया कच्छ एक्सप्रेस ट्रेनची तिकिटे बुक केली. १९ मार्च (गुरुवारी) रोजी दोन्ही जोडप्यांनी एक्सप्रेसने वापीकडे जाणारा आपला सुरू केला. ट्रेनमध्ये चढल्यानंतर आपल्या जवळ बसलेल्या काही प्रवाशांनी त्यांच्याकडील असलेल्या मोठ्या बॅग्स आणि लगेज पाहता त्यांची चौकशी सुरू केली. ते थायलंडवरून आल्याची माहिती कळल्यानंतर काही प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या वेबसाईटवर आॅनलाइन तक्रार केली. आरक्षित डब्यातील तिकीट तपासनीसांनी त्यांचा शोध घेत एक्सप्रेस पालघर येथे थांबवून त्यांना पोलीस आणि रेल्वे अधीक्षकांच्या ताब्यात दिले. रेल्वे प्रशासनाने पालघरच्या आरोग्य पथकाला याची माहिती पुरविल्यानंतर त्यांनी त्यांची तपासणी केली. विमानतळावर त्या चारही जणांची तपासणी न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे नाहीत
या प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याने त्यांना खाजगी वाहनाने वापी येथे रवाना करण्यात आले. १८ मार्चला जर्मनीवरून आलेल्या चार विद्यार्थ्यांना बांद्रा-दिल्ली गरीब रथ एक्सप्रेसमधून पालघरला उतरविण्यात आल्यानंतर लगेच गुरुवारी दुसºयाच दिवशी या दोन जोडप्यांना उतरविण्यात आल्याची घटना घडली.
 

Web Title: Coronavirus: Passengers who Came from abroad news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.