Coronavirus: २१ किमीची पायपीट करून बजावतात कर्तव्य; एसटी बसच्या चालकाचं सर्वत्र कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:10 AM2020-05-04T00:10:13+5:302020-05-04T00:10:25+5:30
राठोड आपल्या कुटुंबासह मनोर येथे राहतात. लॉकडाऊन असल्याने कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांना २१ किमीचा पायी प्रवास करावा लागतो. र
आरीफ पटेल
मनोर : कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. यातीलच एक मनोर येथील देविदास जयसिंग राठोड (५५) हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वाहक. या संकटाच्या काळात देविदास हे २५ डॉक्टर आणि नर्स यांना केईएम रुग्णालयात पोहोचवतात. हे कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना अनेकदा मनोर ते पालघर अशी २१ कि.मी.ची पायपीट करावी लागते आहे.
राठोड आपल्या कुटुंबासह मनोर येथे राहतात. लॉकडाऊन असल्याने कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांना २१ किमीचा पायी प्रवास करावा लागतो. रस्त्यावर एखाद्याने लिफ्ट दिली, तर त्यांना थोडा आराम मिळतो. दुपारी ३ वाजता दादर येथून बस घेऊन सायंकाळी ५ वाजता पालघरला पोहोचतात. त्यानंतर, त्यांचा पुढील मनोर येथे २१ किमीचा प्रवास सुरू होतो. आपल्या घरापासून ते पाण्याच्या दोन-तीन बाटल्या घेऊन पायी पालघरच्या दिशेने निघतात. पालघर बस डेपोचे मॅनेजर नितीन चव्हाण यांनीही राठोड यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे.
डॉक्टर आणि नर्सेस हे माझे दैनंदिन प्रवासी आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. यामुळे मी त्यांना असे सोडू शकत नाही, असे राठोड यांनी सांगितले.