coronavirus: साधू हत्याप्रकरणातील पीडितांच्या वकिलाचा मृत्यू, मेंढवण खिंडीत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:23 AM2020-05-15T02:23:44+5:302020-05-15T02:24:08+5:30

गडचिंचले हत्येप्रकरणात तीन निरपराध लोकांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी डहाणू न्यायालयात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भार्इंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांच्यासह त्यांचा मित्र कारने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून डहाणूच्या दिशेने निघाले होते.

coronavirus: Sadhu murder victim's lawyer's death, accident in Mendhavan pass | coronavirus: साधू हत्याप्रकरणातील पीडितांच्या वकिलाचा मृत्यू, मेंढवण खिंडीत अपघात

coronavirus: साधू हत्याप्रकरणातील पीडितांच्या वकिलाचा मृत्यू, मेंढवण खिंडीत अपघात

Next

पालघर - पालघरच्या गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी निघालेल्या वकील दिग्विजय त्रिवेदी यांचे बुधवारी राज्य महामार्गावरील मेंढवन खिंडीत झालेल्या अपघातात निधन झाले.
गडचिंचले हत्येप्रकरणात तीन निरपराध लोकांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी डहाणू न्यायालयात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भार्इंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांच्यासह त्यांचा मित्र कारने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून डहाणूच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या सोबत अन्य दोन कारमध्ये काही सहयोगीही होते. मनोर मस्तान नाका पार केल्यानंतर त्रिवेदी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ओव्हरटेक करून ते पुढे निघून गेले. ते डहाणूच्या आसपास पोहोचले असताना मागे असलेली कार दिसत नसल्याने त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र संपर्क होत नसल्याने त्यांनी गाड्या माघारी वळवून प्रवास सुरू केला. मेंढवनच्या धोकादायक वळणावर कार उलटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेत त्रिवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सहा आरोपींना १९ मेपर्यंत कोठडी
या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १४१ झाली आहे. गुरुवारी सहा नव्या आरोपींना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. आधीच अटकेत असलेल्या १०६ जणांपैकी पाच जणांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. उर्वरित १०१ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. तरी त्यातील ४० जणांना तिसºया गुन्ह्यात अटक केली असून त्यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 

Web Title: coronavirus: Sadhu murder victim's lawyer's death, accident in Mendhavan pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.