coronavirus: पालघर-विरारमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, वसईत आणखी १२ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:11 AM2020-05-15T02:11:22+5:302020-05-15T02:11:29+5:30

वसई-विरारमध्ये आणखी १२ नवीन रुग्ण आढळून आले असून वाडा तालुक्यातही तीन रुग्ण आढळले आहे.

coronavirus: Two died of coronavirus in Palghar-Virar, 12 more patients were found in Vasai | coronavirus: पालघर-विरारमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, वसईत आणखी १२ रुग्ण आढळले

coronavirus: पालघर-विरारमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, वसईत आणखी १२ रुग्ण आढळले

Next

पालघर/वसई : पालघरमध्ये एक महिला आणि विरारमध्ये एका पुरुषाचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, वसई-विरारमध्ये आणखी १२ नवीन रुग्ण आढळून आले असून वाडा तालुक्यातही तीन रुग्ण आढळले आहे.

पालघर-माहीम रस्त्यावरील सुंदरम स्कूलजवळील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील एका ४६ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने हा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. या महिलेच्या संपर्कातील लोकांची संख्या मोठी असल्याची माहिती पुढे येत असून त्यांना शोधण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. तर, वसई तालुक्यात गुरुवारी १२ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आता एकूण रुग्णसंख्या २७५ वर गेली आहे. तर विरार पश्चिमेकडील ५६ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १३३ जण कोरोनामुक्त झाले असून १३० जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: coronavirus: Two died of coronavirus in Palghar-Virar, 12 more patients were found in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.